पुणे: पाळलेल्या माजरींची काळजी घेतली नाही म्हणून दोन महिलांवर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2017 04:43 PM2017-09-12T16:43:04+5:302017-09-12T16:43:04+5:30

पाळलेल्या माजरींची काळजी घेतली नाही म्हणून पुण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपिका कपूर आणि संगीता कपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावं आहेत. 

Pune: Crime against two women has not taken care of the majors | पुणे: पाळलेल्या माजरींची काळजी घेतली नाही म्हणून दोन महिलांवर गुन्हा

पुणे: पाळलेल्या माजरींची काळजी घेतली नाही म्हणून दोन महिलांवर गुन्हा

Next
ठळक मुद्दे पाळलेल्या माजरींची काळजी घेतली नाही म्हणून पुण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखलकोंढव्यातील दोन महिलांवर गुन्हा दाखल

पुणे, दि. 12 - पाळलेल्या माजरींची काळजी घेतली नाही म्हणून पुण्यात दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोंढव्यातील दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपिका कपूर आणि संगीता कपूर अशी गुन्हा दाखल झालेल्या महिलांची नावं आहेत. 
घरात असलेल्या 20ते 25 मांजरींची व्यवस्थीत काळजी घेत नसल्याचा आरोप करत  शेजारी राहणा-या एका व्यक्तीने ही फिर्याद दिली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी चक्क 20ते 25 मांजरी ताब्यात घेतल्या आहेत. घरात तब्बल 20-25 मांजरी आहेत. मात्र या मांजरींचे ते निगा राखत नाहीत, अत्यंक घाणेरड्या वातावरणात या मांजरींना जगावं लागतंय. मांजरींना फ्लॅटमध्ये कोंडून ठेवणे, त्यांची विष्ठा साफ न करणे असे आरोप लावले आहेत. शेजारच्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करत 20 ते 25 माजरींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. 

यापूर्वी देखील पुण्यात गाजला होता मांजर वाद-
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यसभा खासदार वंदना चव्हाण यांनी मांजराला मारहाण केल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे त्यांना न्यायालयाने नोटीस पाठवून कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले होते. वंदना चव्हाण यांनी शेजाऱ्यांच्या मांजरांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसात तक्रार दिली होती. त्यांच्या शेजारी राहणाऱ्या विजय नावडीकर यांनी सात-आठ मांजर पाळली आहेत. ती मांजर सोसायटीतील कोणाच्याही घरात घुसतात. त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वंदना चव्हाण यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. परंतु बंदोबस्त झाला नाही. एक दिवस एक मांजर त्यांच्या घरात शिरले असता, त्या मांजराला सळईने मारहाण केल्यामुळे नावडीकर चीडले. मांजर अपंग झाल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात खटला दाखल केला. दोन वर्षे खटला चालला आणि त्यानंतर न्यायालयाकडून चव्हाणांना नोटीस पाठवण्यात आली.

Web Title: Pune: Crime against two women has not taken care of the majors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे