पाणीकर वसुलीत पुणे विभाग प्रथम
By admin | Published: June 13, 2016 05:03 AM2016-06-13T05:03:13+5:302016-06-13T05:03:13+5:30
आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या काही विभागांनी यंदा पाणीकराची दमदार वसुली केली आहे.
विलास गावंडे,
यवतमाळ- आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या काही विभागांनी यंदा पाणीकराची दमदार वसुली केली आहे. पुणे विभागाने १०४.३३ टक्के वसुली करत पहिला क्रमांक मिळविला आहे.
सर्वात कमी ५५.६१ टक्के वसुली औरंगाबाद विभागाची आहे. प्राधिकरणाला २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी २५१ कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मार्चअखेर २१० कोटी अर्थात ८५ टक्के वसुली करण्यात आली. प्राधिकरणाची मागील काही वर्षांतील ही सर्वाधिक चांगली कामगिरी आहे.
पाणीकर वसुली, प्रकल्पाचे शुल्क हेच या विभागाचे उत्पन्नाचे साधन आहे. उत्पन्न वाढीअभावी योजनांची देखभाल दुरुस्ती आणि वेतनाचा खर्च भागविताना विभागाला मोठी कसरत करावी लागते. यंदा उत्पन्नवाढीसाठी वसुलीचा धडाका लावण्यात आला. प्राधिकरणामार्फत राज्यातील सहा महसूल विभागात ५४ योजना कार्यान्वित आहेत. अमरावती विभागात सर्वाधिक १५ तर १३ योजना पुणे विभागात आहेत. औरंगाबाद आणि कोकण विभागात प्रत्येकी पाच योजना आहेत. नागपूर नऊ आणि नाशिक विभागात सात योजना चालविण्यात येत आहेत.
औरंगाबाद आणि कोकण विभागात प्रत्येकी
५ योजना