पुणे: दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेलेल्या होमगार्ड व पोलिसांना मारहाण, पोलीस उपनिरिक्षकांच्या डोक्याला टाके
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2017 08:25 PM2017-10-01T20:25:25+5:302017-10-01T20:26:31+5:30
खेड तालुक्यातील प्रश्चिम भागातील शिरगावची विठ्ठलवाडी येथे आज सकाळी 4 पोलिस 8 महिला पोलिस , होमगार्ड 9 असे पथक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते.
पुणे- खेड तालुक्यातील प्रश्चिम भागातील शिरगावची विठ्ठलवाडी येथे आज सकाळी 4 पोलिस 8 महिला पोलिस , होमगार्ड 9 असे पथक गावठी दारूचे अड्डे उद्ध्वस्त करण्यासाठी गेले होते. यावेळी पोलिसांनी गावठी दारु तयार करणाऱ्या ३ महिलांना पकडून पोलिस गाडी बसविले होते. आमची माणसं घेऊन जाऊ नका असे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, अचानक विठ्ठलवाडी ग्रामस्थ व महिलांनी आक्रमक होत हातात कोयते, काठ्या, दगड घेऊन पोलिस व होमगार्ड यांच्यावर हल्ला केला.
पंधरा मिनटे पोलिस होमगार्ड यामध्ये झटापट मारहाण सुरू होती. यामध्ये 4 पोलिस होमगार्ड या यांना बेदम मारहाण करण्यात आली. पोलिस उप निरिक्षक आदित्य लोणीकर यांच्यावर जोरदार हल्ला केला. त्यांच्या डोक्याला दोन टाके पडले आहे होमगार्ड जयंवत कोहिनकर यांच्या डोक्याला 10 टाके पडले आहेत. महिला पोलिसांच्या डोक्याच्या झिंज्या ओढून फरफटत नेऊन मारहाण केली. तसेच पोलिस व होमगार्डला बेदम मारहाण केली. तरीही याप्रकरणी गुन्हा अजूनही दाखल झालेला नाही.