पुणे: ३ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी तरूणाचे अपहरण, तत्पर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या
By Admin | Published: June 28, 2016 10:25 AM2016-06-28T10:25:21+5:302016-06-28T10:30:59+5:30
तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी पुण्यातील हडपसर परिसरातून एका २८ वर्षीय युवकाचे अपहरण केले, मात्र पोलिसांनी तत्परता दाखवत २४ तासांच्या आत खंडणीखोरांच्या मुसक्या आवळल्या.
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - तीन कोटी रुपयांच्या खंडणीसाठी पुण्यातील हडपसर परिसरातून एका २८ वर्षीय युवकाचे अपहरण करण्यात आल्याची घटना सोमवारी घडली. मात्र खंडणीविरोधी पथकातील पोलिसांनी तत्परता दाखवून सापळा रचत २४ तासांच्या ५ खंडणीखोरांच्या मुसक्या आवळून त्या तरूणाची सुटकाही केली. एखाद्या थ्रिलर चित्रपटाची कथा शोभावी अशी ही घटना पुण्यात घडली.
राठी या २८ वर्षीय तरूणाचे सोमवारी ५ आरोपींनी अपहरण केले होते. सदर तरूण हा सधन कुटुंबातील असून त्याच्या कुटुंबियांचे अनेक व्यवसाय आहेत. खंडणीखोरांनी त्याच्या घरी फोन करून ३ कोटी रुपयांची मागणी केली. हे वृत्त कळताच संपूर्ण पोलीस दल रात्रीपासून कामाला लागले आणि खंडणीखोरांचे फोन टॅप करून लोकेशन शोधण्याचा प्रयत्न केला. ब-याच वेळानंतर त्यांना खंडणीखोरांचे लोकेशन सापडले, यवत येथून खंडणीसाठी सारखे फोन येत होते.
माहिती मिळताच खंडणी विरोधी पथक यवत येथील एका धाब्यावर पोहोचले. तेथे एक काळ्या रंगाची झेन कार उभी होती, मात्र त्याच्या काचा बंद असल्याने पोलिसांना संशय आला. त्यांनी काचा फोडल्या असता कारमध्ये त्यांना अपहरित तरूण व ४ खंडणीखोर आरोपी सापडले. तर एक आरोपी उसात लपून बसला होता, पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याच्याही मुसक्या आवळल्या व त्या अपहरित तरूणाची सुखरूप सुटका केली.