पुणे-कोल्हापूर संघर्ष यात्रा २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ
By Admin | Published: November 8, 2015 12:27 AM2015-11-08T00:27:01+5:302015-11-08T00:27:01+5:30
डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे व एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुमारे पन्नास डाव्या व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे व एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुमारे पन्नास डाव्या व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातीमुक्ती आंदोलन हाती घेतले आहे.
आंदोलनात राज्यात २१ ते २४ नोव्हेंबरला संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती चळवळीचे राज्य नियंत्रक अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. दाभोळकर यांची हत्या झालेल्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून ही यात्रा सुरू होणार आहे. मारेकरी व सूत्रधारांना सामाजिक बळाचे दर्शन घडविण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्यांनीच समाजातील वेगवेगळ््या प्रश्नांवर लढणाऱ्यांवर हल्ले करण्याची भूमिका घेतली आहे.
त्यामुळे अशा प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या आणि
हिंसेचा उपदेश देणाऱ्या पद्धतीचे लिखाण करणाऱ्या सनातन
प्रभात संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी व त्यांच्या
व्यवहाराची चौकशी करण्याच्या उद्देशाने ही संघर्ष यात्रा आणि सभा होणार आहे.
कोल्हापुरात सभा घेण्याचे नियोजन आहे. डॉ. भारत पाटणकर, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, उदय भगत, किशोर ढमाले, किशोर जाधव, विजय कुलकर्णी पत्रपरिषदेला उपस्थित होते. (प्रतिनिधी)