लाचखोरी उघडकीस आणण्यात पुणे आघाडीवर

By Admin | Published: December 9, 2015 12:28 AM2015-12-09T00:28:36+5:302015-12-09T00:28:36+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय नोकरदारांकडून होणाऱ्या लाचखोरीविरोधात केलेल्या जनजागृतीचा सर्वाधिक परिणाम पुणे विभागात झाला असून

Pune leads the bribe | लाचखोरी उघडकीस आणण्यात पुणे आघाडीवर

लाचखोरी उघडकीस आणण्यात पुणे आघाडीवर

googlenewsNext

पुणे : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शासकीय नोकरदारांकडून होणाऱ्या लाचखोरीविरोधात केलेल्या जनजागृतीचा सर्वाधिक परिणाम पुणे विभागात झाला असून, ही लाचखोरी रोखण्यात पुणे आघाडीवर राहिले आहे़ या वर्षभरात सर्वाधिक २०६ सापळा केस पुणे विभागाने यशस्वी केल्या आहेत़
राज्यभरात १ जानेवारी ते ७ डिसेंबर २०१५ दरम्यान १ हजार १४८ सापळा केस करण्यात आल्या़ त्यात सर्वाधिक २०६ सापळा केस पुणे विभागाने केल्या आहेत़ त्याखालोखाल नाशिक १७७, औरंगाबाद १६७ आणि नागपूर विभागाने १६४ केस केल्या आहेत़ राज्यात महसूल विभागात सर्वाधिक २८३ सापळा केस करण्यात आल्या़ त्याखालोखाल २५६ केस पोलीस खात्यात झाल्या असून, पंचायत समितीमध्ये १२७, महापालिकांमध्ये ६८ केस करण्यात आल्या आहेत़
पुणे विभागाने सापळा केस करण्यात आघाडी घेण्याबरोबरच तब्बल १०२ प्रकरणांत दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करून इतर विभागांपेक्षा सरस कामगिरी केली आहे़ सध्याचे पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित हे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे प्रमुख असताना त्यांनी या विभागाला खऱ्या अर्थाने गती दिली़ लाचखोरी करणाऱ्यांविरोधात त्यांनी मोहीमच उघडली़ शासकीय असूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे संकेतस्थळ यांनी अद्ययावत केले़ लाचखोरीविषयी लोकांचा विश्वास संपादन करण्यासाठी १,०६४ हा हेल्पलाईन क्रमांक उपलब्ध केला़ आणि त्यावर येणाऱ्या सर्व तक्रारींची शहानिशा करून त्यावर योग्य ती कारवाई होत आहे, याकडे लक्ष दिले़
अनेकदा शासकीय अधिकाऱ्यांना लाच घेताना पकडले, तरी त्यांच्यावर खटला दाखल करण्यापूर्वी शासनाची परवानगी आवश्यक असते़ अनेकदा ही परवानगी वर्षानुवर्षे मिळत नाही़ ज्या विभागाने अशा खटल्यांना परवानगी देण्यास ९० दिवसांपेक्षा जास्त दिवस वेळ लावला, त्या विभागाची माहितीच संकेतस्थळावर टाकण्यास सुरुवात केली़ परिणामी अनेक विभागांमध्ये पडून राहिलेल्या कागदपत्रांवर सह्या होऊ लागल्या़
पुणे विभागाचे अपर पोलीस अधीक्षक अर्जुन सकुंडे म्हणाले, ‘‘आम्ही लाचखोरीविरोधात जनजागृती, प्रबोधन यांवर भर दिला होता़ लोकांच्या मानसिकतेत बदल करण्याचा प्रयत्न केला़ त्यावर लोकांनी विश्वास दाखवून केलेल्या तक्रारीला आमच्या विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला़ त्यामुळे राज्यात सर्वाधिक कारवाया आम्ही करू शकलो़ पुण्यात १,०६४ आणि ई-मेलद्वारे अधिक तक्रारी आल्या़’’ (प्रतिनिधी)
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेली कारवाई
१ जानेवारी ते ७ डिसेंबर २०१५
परिक्षेत्रसापळाअपसंपदाअन्य भ्रष्टाचारएकूण
मुंबई६१६३७०
ठाणे१३४६२१४२
पुणे२०६२१२०९
नाशिक१७७५-१८२
नागपूर१६४८-१७२
अमरावती१२७२-१२९
औरंगाबाद१६७१२१७१
नांदेड११२१२११५
एकूण११४८३२१०११९०

Web Title: Pune leads the bribe

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.