पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाची तयारी पूर्ण

By admin | Published: December 23, 2016 05:45 PM2016-12-23T17:45:36+5:302016-12-23T17:45:36+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे शनिवारी भूमिपूजन होत असून या समारंभासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल ५० हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

Pune metro project completed | पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाची तयारी पूर्ण

पुणे मेट्रोच्या भूमिपूजनाची तयारी पूर्ण

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 23 - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोचे शनिवारी भूमिपूजन होत असून या समारंभासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. तब्बल ५० हजार नागरिकांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. 
पालकमंत्री गिरीष बापट यांनी शुक्रवारी तयारीची पाहणी केली.  खासदार संजय काकडे,   पोलीसआयुक्त रश्मी शुक्ला, जिल्हाधिकारी सौरभ राव, खासदार संजय काकडे, भाजप शहराध्यक्ष योगेश गोगावले उपस्थित होते. 
कृषी महाविद्यालयाच्या सिंचननगर येथील पटांगणात हा समारंभ होणार असून नागरिकांना बसण्यासाठी ३५ हजार खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मागच्या बाजूस भारतीय बैठकीचीही व्यवस्था करण्यात आली आहे.  सहा मोठे स्क्रीन्स लावण्यात आले असून बाहेरच्या बाजूसही ४ स्क्रीन्स लावण्यात आले आहेत. तीन किलोमीटर पर्यंत  आवज ऐकू जाईल असे ध्वनीक्षेपक लावण्यात आले आहेत. आठ ते दहा हजार वाहनांसाठी वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी संध्याकाळी मुंबईतील कार्यक्रमानंतर ६.३५ पर्यंत येथे येणार असून ६.४० ला  कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. कार्यक्रमानंतर ८ वाजता मोदी दिल्लीकडे रवाना होणार आहेत. अशी माहिती बापट यांनी यावेळी दिली.
नागरिकांनी कार्यक्रमाला येताना कुठल्याही प्रकारचे साहित्य, छत्री, पाण्याची बाटलीही आणू नये असे आवाहन पोलिस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी केले आहे. सुरक्षेसाठी सर्वांची तपासणी होणार असल्याने कार्यक्रमाच्या दोन तास आधी सर्वांनी उपस्थित रहावे असेही त्या म्हणाल्या.     

Web Title: Pune metro project completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.