पुण्यातील मेट्रो प्रकल्प मार्गी
By admin | Published: September 9, 2015 07:06 PM2015-09-09T19:06:43+5:302015-09-09T19:50:40+5:30
पुणे मेट्रो प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून लवकरच काम सुरु होणार आहे. आज दिल्ली येथे नितीन गडकरीच्या अध्यक्षेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ९ - पुणे मेट्रो प्रकल्पातील अडथळे दूर झाले असून लवकरच काम सुरु होणार आहे. आज दिल्ली येथे रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बापट समितीचा अहवाल स्वीकारण्यात आला असून पुणे मेट्रोच्या अडथळ्यांना पूर्णविराम मिळाला आहे.
बुधवारी दिल्लीत नितिन गडकरी, नगर विकास मंत्री व्यंकय्या नायडू, प्रकाश जावडेकर, गिरीश बापट, शरद पवार, एकनाथ शिंदे, अजित पवार आदींच्या उपस्थितीत पुणे मेट्रो, रिंगरोड यासंदर्भात बैठक झाली. पुण्यातील मेट्रो मुख्यत: जमिनीवरूनच धावेल आणि केवळ दाटीवाटीच्या भागांमध्ये जमिनीखालून जाईल असं गिरीश बापट यांनी स्पष्ट केले. या मेट्रोमुळे येत्या काही वर्षात पुण्याची वाहतूक सुरळित होईल आणि ट्रॅफिक जामविना प्रवास करता येईल अशी अपेक्षा आहे.
मेट्रोचा खर्च १२ ते १४ हजार कोटी रुपयांच्या घरात असून हा खर्च करताना प्रवाशांना परवडेल अशी असेल अशी अपेक्षा बापट यांनी व्यक्त केली आहे. पुणे मेट्रोसाठी लष्कराच्या हद्दीतील जागा १० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर घेणार असल्याचे बापट यांनी सांगितले.