पुणे मेट्रोचा मार्ग होणार मोकळा!

By admin | Published: October 1, 2016 02:00 AM2016-10-01T02:00:48+5:302016-10-01T02:00:48+5:30

राष्ट्रीय स्मारकांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही व संबंधित कायद्याचे पालन करूनच पुणे मेट्रो प्रकल्प राबवण्याची खबरदारी पुणे महापालिकेने घ्यावी, असे म्हणत

Pune Metro route will be ready! | पुणे मेट्रोचा मार्ग होणार मोकळा!

पुणे मेट्रोचा मार्ग होणार मोकळा!

Next

मुंबई : राष्ट्रीय स्मारकांना कोणत्याही प्रकारे धक्का लागणार नाही व संबंधित कायद्याचे पालन करूनच पुणे मेट्रो प्रकल्प राबवण्याची खबरदारी पुणे महापालिकेने घ्यावी, असे म्हणत शुक्रवारी उच्च न्यायालयाने पुणे मेट्रोचा मार्ग बदलण्याची मागणी करणारी याचिका निकाली काढण्याचे संकेत दिले.
पुणे मेट्रोचा मार्ग क्र १ पाताळेश्वर मंदिर व शनिवार वाडा तसेच मार्ग क्र २ पाताळेश्वर मंदिर ते आगाखान पॅलेस या राष्ट्रीय स्मारकांच्या प्रतिबंधात्मक क्षेत्रातून जाणार आहे. राष्ट्रीय स्मारकांच्या १०० मीटर परिसरात विकास करण्यास कायद्याने प्रतिबंधित असतानाही याच क्षेत्रातून पुणे मेट्रोचे दोन मार्ग जात आहेत. त्यामुळे राष्ट्रीय स्मारकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे, असे म्हणत पुण्याच्या परिसर संरक्षण संवर्धन संस्थेने पुणे मेट्रोचा मार्ग बदलण्यात यावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. (प्रतिनिधी)

Web Title: Pune Metro route will be ready!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.