धक्कादायक! पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यातील 'ही' 3 मोठी शहरं टॉपवर; युवा वर्गाला पॉर्नचा चस्का

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 01:21 PM2021-07-24T13:21:57+5:302021-07-24T13:26:52+5:30

महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींबरोबरच महिलाही गुगलवर पॉर्न सर्चिंग करत असल्याचे समोर आले आहे. अर्थात, तरुण वर्गाबरोबरच महिलांनाही पॉर्न बघण्याचा मोह होत असल्याचे समोर आले आहे. याच बरोबर वृद्ध मंडळीही पॉर्नच्या मोहात

Pune Nashik and nagpur on top in the state in porn searching; Young people crave porn | धक्कादायक! पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यातील 'ही' 3 मोठी शहरं टॉपवर; युवा वर्गाला पॉर्नचा चस्का

धक्कादायक! पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यातील 'ही' 3 मोठी शहरं टॉपवर; युवा वर्गाला पॉर्नचा चस्का

googlenewsNext

मुंबई - देशात जवळपास पाच वर्षांपासून पॉर्न साईट्सवर बंदी घालण्यात आली आहे. यात साधारणपणे 850 हून अधिक पॉर्न साइट्सचा समावेश आहे. असे असतानाही आंबटशौकीनांचे पॉर्न पाहणे अद्यापही थांबलेले दिसत नाही. राज्याचा विचार करता, धक्कादायक बाब म्हणजे, गुगलवरील पॉर्न सर्चिंगमध्ये राज्यातील पुणे, नाशिक आणि नागपूर या तीन शहरांचा प्रत्येकी पहिल्या-दुसरा आणि तिसरा क्रमांक लागतो, अशी माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे.

महिला आणि वृद्धही मोहात  -
महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींबरोबरच महिलाहीगुगलवर पॉर्न सर्चिंग करत असल्याचे समोर आले आहे. अर्थात, तरुण वर्गाबरोबरच महिलांनाही पॉर्न बघण्याचा मोह होत असल्याचे समोर आले आहे. याच बरोबर वृद्ध मंडळीही पॉर्नच्या मोहात पडल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, पॉर्न वेब साईटवर विविध जाहिराती दाखवून अनेकांना गंडा घालण्याचे प्रकारही वाढले आहेत.

'या' आहेत जगातील सर्वात वयस्क सेक्स वर्कर्स, 100 वर्ष काम; रिटार्यरमेंटनंतर केला धक्कादायक खुलासा!

पॉर्न पाहणाऱ्यांच्या संख्येत चौपट वाढ -
अश्‍लील फिल्म पाहणाऱ्यांमध्ये आणि पॉर्नसाईट्सना भेट देणाऱ्याच्या संख्येत तब्बल चार पट वाढ झाली आहे. यात शाळेतील मुलं-मुली, महाविद्यालयीन तरूण, तरुणी, महिलावर्ग आणि वृद्धांचाही समावेश आहे. राज्याची उप राजधानी असलेल्या नागपूरमध्येही पॉर्न सर्चिंगचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. आता सायबर पोलिसांनीही यावर नजर ठेवायला सुरुवात केली आहे. 

Pornography Case: क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी शिल्पा शेट्टीला विचारला थेट प्रश्न; मिळालं असं उत्तर 

पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर होता -
महत्वाचे म्हणजे, पॉर्न साइट्सवर बंदी घातलेली असतानाही, जानेवारी 2020मध्ये पॉर्नहबने जाहीर केलेल्या पॉर्न बघणाऱ्यांच्या यादीत भारत पहिल्या स्थानावर होता. अनेकदा पॉर्न साईटच्या नावात बदल करूनही त्या पुन्हा उपलब्ध होतात. टोर ब्राऊझर, मिरर साइट अथवा व्हर्चुअल प्रायवेट नेटवर्क सर्व्हिस, यांचा वापर करूनही पॉर्न पाहिले जात आहे.

 
 

Read in English

Web Title: Pune Nashik and nagpur on top in the state in porn searching; Young people crave porn

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.