राज्यभर हुडहुडी, थंडीचा कडाका जाणवणार; पुणे, नाशिक, महाबळेश्वरला थंडी वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 07:35 AM2024-11-26T07:35:30+5:302024-11-26T07:36:02+5:30
पुण्यात हुडहुडी ! पुण्यात सोमवारी थंडीचा कडाका जाणवला. कमाल तापमान ३० अंशाच्या खाली आले असून, किमान तापमान १० ते १२ अंशावर नोंदवले जात आहेे.
पुणे - राज्यामध्ये तापमानामध्ये चढ-उतार अनुभवायला मिळत आहे. गेल्या दोन तीन दिवसांमध्ये तापमान १२ वरून १० अंशावर नोंदवले जात आहे. सोमवारी (दि.२५) तर परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ९.६ अंश तापमानाची नोंद झाली. ही या हंगामातील निचांकी आहे. पुण्यातही सोमवारी ‘एनडीए’ भागात १० अंशावर तापमान होते.
हवामान विभागानुसार पुढील काळामध्ये राज्यात अनके भागातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी थंडी वाढेल, असा इशारा देण्यात आला. राज्यावर हवेचा दाब निर्माण झाल्याने थंडीत चढ-उतार होत आहे. थंडी वाढेल असाही अंदाज देण्यात आला.
राज्यातील किमान तापमान
- पुणे १२.१
- जळगाव १२.४
- कोल्हापूर १६.७
- महाबळेश्वर १२.०
- नाशिक १२.०
- सांगली १५.७
- सोलापूर १५.६
- मुंबई २३.०
- परभणी १२.७
- नागपूर १३.०