प्रभूकृ पेमुळे पुणे-नाशिक प्रवास सुकर

By Admin | Published: March 10, 2016 12:46 AM2016-03-10T00:46:24+5:302016-03-10T00:46:24+5:30

रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ग्रीन सिग्नल दिलेल्या प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्गामुळे पिंपरी, चिंचवड, तळेगाव, चाकण, संगमनेर, सिन्नर, नाशिक येथील औद्योगिक वसाहती एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत.

Pune-Nashik Travel Suuq due to the impact of Prakruti | प्रभूकृ पेमुळे पुणे-नाशिक प्रवास सुकर

प्रभूकृ पेमुळे पुणे-नाशिक प्रवास सुकर

googlenewsNext

नीलेश जंगम, पिंपरी
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी ग्रीन सिग्नल दिलेल्या प्रस्तावित पुणे-नाशिक रेल्वेमार्गामुळे पिंपरी, चिंचवड, तळेगाव, चाकण, संगमनेर, सिन्नर, नाशिक येथील औद्योगिक वसाहती एकमेकांशी जोडल्या जाणार आहेत. या मार्गामुळे प्रवाशांचा दोन ते अडीच तास वेळ वाचणार आहे. उद्योजकांना मालवाहतुकीसाठी तसेच शेतमालाची वाहतूक करणेही या मार्गामुळे सोयीचे होणार आहे.
११ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला केंद्र सरकारने अखेर हिरवा कंदील दाखविला आहे. केंद्र सरकारने पुणे-नाशिकच्या २६६ किलोमीटर मार्गासाठी एक हजार २१२ कोटी पाच लाख रुपये निधीची तरतूद केली आहे.
पुणे-नाशिक रेल्वेमार्गासाठी दोन हजार ४५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. यामध्ये केंद्र व राज्य सरकारकडून खर्चाचा अर्धा अर्धा भार उचलला जाणार आहे. त्यानुसार केंद्र सरकारने त्यांच्या हिश्याचे एक हजार २१२ कोटी पाच लाख रुपये मंजूर केले. पुणे व नाशिक या शहरांना जोडणारा हा रेल्वेमार्ग नागरी व औद्योगिकदृष्ट्या उपयुक्त आहे. पुणे-नाशिक रेल्वेमार्गामुळे पुणे व नाशिक या दोन्ही जिल्ह्यांचा विकास होणार आहे. चाकण, रांजणगाव एमआयडीसीतील उद्योगांनाही त्याचा फायदा होणार आहे.
यापुर्वी या मार्गास पुरवणी मागण्यांद्वारे तत्त्वत: मान्यता देण्यात आली होती. मात्र, केंद्रीय नियोजन मंडळाकडे प्रस्ताव रखडल्याने प्रत्यक्ष काम झाले नाही. आता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात या मार्गासाठी निधीची तरतूद केल्याने पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग मोकळा झाला आहे. सर्वप्रथम २००५ मध्ये पुणे-नाशिक रेल्वेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविण्यात आला होता.
पुणे-नाशिक या २६६ किलोमीटरच्या रेल्वेमार्गावर नव्या १५ रेल्वे स्थानकांची भर पडणार आहे. या मार्गावरील रेल्वे स्थानकांची संख्या आता २५ होणार आहे. या मार्गावर पुणे स्थानक, शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, देहूरोड, बेगडेवाडी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर, नाशिक रोड या स्थानकांचा समावेश असेल. याशिवाय रेल्वेमार्गावर २२ मोठे आणि १३२ मध्यम पूल असतील.
> रेल्वेमार्गापैकी १४५ किलोमीटर पुणे जिल्ह्यातून, ५९ किलोमीटर नगर, तर ६२ किलोमीटर लोहमार्ग नाशिक जिल्ह्यातून जाणार आहे.
सध्या या तीन जिल्ह्यांत ४६ हजार किलोमीटरहून अधिक मोठे रस्त्यांचे जाळे आहे. त्यामध्ये तीन जिल्ह्यांत मिळून तब्बल ७०७ किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग.चार हजार ५१२ किलोमीटरच्या राज्यमार्गासह त्याच्या दीडपट जिल्हा मार्गाचे रस्ते वाहतुकीचे जाळे आहे. दिवसागणिक त्यावरील वाढते प्रवाशी व मालवाहतुकीचा ताण प्रस्तावित रेल्वेमार्गामुळे कमी होणार आहे.

पुणे स्थानक, शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, देहूरोड, बेगडेवाडी, चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर, सिन्नर, नाशिक रोड या स्थानकांचा समावेश असेल.
> असा आहे रेल्वे मार्ग
खर्च-२४२५ कोटी
रेल्वे स्थानकांची संख्या-२५
नवीन रेल्वे स्थानके-१५
जुनी रेल्वे स्थानके-१०
लोहमार्गाची लांबी-२६६ किलोमीटर
जोडणारे जिल्हे- पुणे, नगर आणि नाशिक

Web Title: Pune-Nashik Travel Suuq due to the impact of Prakruti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.