पुणे फणफणले डेंग्यूने

By admin | Published: September 5, 2014 12:53 AM2014-09-05T00:53:15+5:302014-09-05T00:53:15+5:30

शहरात गणोशोत्सवाची धूमधाम पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असताना, पुणोकर मात्र डेंग्यूच्या तापाने चांगलेच फणफणले आहेत.

Pune Phanfanle dengue | पुणे फणफणले डेंग्यूने

पुणे फणफणले डेंग्यूने

Next
ऐन सणासुदीत उद्रेक : एकाच दिवशी 51 जणांना लागण 
पुणो : शहरात गणोशोत्सवाची धूमधाम पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक येत असताना, पुणोकर मात्र डेंग्यूच्या तापाने चांगलेच फणफणले आहेत. आज डेंग्यूची लागण झालेले 51 रुग्ण एकाच दिवशी शहरात आढळून आले आहेत. तर सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या चार दिवसांतच या आजाराची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा 18क् वर पोहोचला आहे. विशेष म्हणजे या रुग्ण आढळत असतानाही, पालिका प्रशासन मात्र ढिम्मच दिसून येत आहे. 
शहरात दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात डेंग्यूचे रुग्ण मोठय़ा प्रमाणात आढळतात. मात्र, गेल्या 8 महिन्यांपासून शहरात या साथीचे रुग्ण आढळून येत आहेत. त्यानंतरही प्रशासनास ही साथ रोखण्यास अपयश येत असल्याचे चित्र आहे. ही साथ रोखण्यासाठी आरोग्य विभागाकडून डासांची पैदास होणारी ठिकाणो शोधून त्या ठिकाणी औषधफवारणी करणो आवश्यक आहे. मात्र, यासाठी  कीटकनाशक खरेदीचा घोळ व औषध फवारणीसाठी उपलब्ध नसलेले मनुष्यबळ याचा थेट फटका पुणोकरांना सहन करावा लागत आहे. गेल्या आठ महिन्यांत शहरात 1 हजार 791 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील जवळपास दीड हजार रुग्ण मागील तीन महिन्यांतील आहेत. (प्रतिनिधी)
 
4शहरात पावसाळा सुरू होताच डेंग्यूचे रुग्ण वाढण्यास सुरुवात झालेली आहे. त्यात दहीहंडीपाठोपाठ गणोशोत्सवातही पुणोकरांना साथीच्या रोगांचा सामना करावा लागत आहे. याशिवाय शहरात डेंग्यूसदृश तापाचे रुग्णही मोठय़ा प्रमाणात आढळून येत आहेत. गणोशोत्सवानिमित्त बाहेरगावाहून लाखो भाविक येत आहेत. त्यामुळे आजाराची लागण होऊन गेलेल्या रुग्णांचा तर आकडा किती असेल, हे सांगता येणार नाही.
 
डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी डासांची पैदास रोखणो महत्त्वाचे आहे. डबकी, ड्रेनेजची झाकणो, अनेक दिवसांपासून पाणी भरून ठेवलेली भांडी याठिकाणी ही पैदास होते. पालिकेने फवारणी करूनही पैदास थांबणार नाही. त्याऐवजी सोसायट्यांनी डास वाढणारी ठिकाणी नष्ट केल्यास हा आजार नियंत्रणामध्ये येईल.
- डॉ. विश्वजित चव्हाण, 
सचिव, पुणो डॉक्टर्स चॅरिटेबल ट्रस्ट
 
काळजी घ्या.!
4घरात जास्त दिवस पाणी साठणार नाही यासाठी दक्षता घ्या. खबरदारी म्हणून घरात कोठेही डासांची पैदास आढळून आली असल्यास तत्काळ पालिकेशी संपर्क साधा. 

 

Web Title: Pune Phanfanle dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.