पुणे: तरूणीचा चेहरा लावून अश्लिल व्हिडीओ पसरवला, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2017 04:51 PM2017-09-15T16:51:58+5:302017-09-15T16:56:56+5:30

व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ एडिट करून तरुणीचा चेहरा लावून अश्लिल व्हिडिओ पसरविणा-या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने ही क्लीप एका व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकली होती. 

Pune: Police raided the face of teenager, police arrested a member of Whitswap group | पुणे: तरूणीचा चेहरा लावून अश्लिल व्हिडीओ पसरवला, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्याला अटक

पुणे: तरूणीचा चेहरा लावून अश्लिल व्हिडीओ पसरवला, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्याला अटक

Next

पुणे, दि. 15 - व्हॉट्सअ‍ॅपवर व्हिडीओ एडिट करून तरुणीचा चेहरा लावून अश्लिल व्हिडिओ पसरविणा-या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपच्या सदस्याला फरासखाना पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीने ही क्लीप एका व्हॉटसअॅप ग्रुपवर टाकली होती. पण आरोपीने हा इतर ग्रुपवर आलेला व्हिडीओ मी केवळ फॉरवर्ड केल्याचं सांगितले. मात्र, तो तसं सिद्ध करु न शकल्याने त्याला अटक करण्यात आली आहे. 

मयुरेश विजय ताकवले (वय २६, रा. कसबा पेठ, पुणे) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी एका वीस वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. कसबा पेठेत गावकोस मारुती मंदिराजवळ ही तरुणी राहते. आरोपीही त्याच परिसरात रहातो. आरोपी ताकवले याने ऋषिकेश दादा पटेकर या व्हॉटस अ‍ॅप ग्रुपवर या तरुणीच्या चेह-याचा वापर करुन लैंगिक संबंध असलेला व्हिडीओ प्रसारीत केला. आरोपीवर माहिती तंत्रज्ञान कायद्यानूसार गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आले. संबंधित तरुणी वाणिज्य शाखेच्या तिस-या वर्षांत शिकत आहे.

संबंधित तरुणीच्या एका ओळखीच्या मुलाने या व्हिडिओबद्दल पिडीत तरुणीला माहिती दिली. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यात छेडछाड करुन संबंधित व्हिडिओला पिडित तरुणीचा चेहरा लावण्यात आला. संबंधित तरुणाने हा व्हिडिओ कोणत्या ग्रुपवरुन आला ते सांगितले. त्यानुसार पिडित तरुणीने पोलिसठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यावरुन पोलिसांनी संशियित तरुणाला अटक केली. याप्रकरणी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे तपास करीत आहे.

Web Title: Pune: Police raided the face of teenager, police arrested a member of Whitswap group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.