पुणे : 'समृद्ध जीवन'चे महेश मोतेवार पोलिसांच्या ताब्यात

By admin | Published: December 28, 2015 03:02 PM2015-12-28T15:02:46+5:302015-12-28T15:03:41+5:30

सेबीने निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेले 'समृद्ध जीवन'चे प्रमुख महेश मोतेवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

Pune: In possession of Mahesh Motewar Police of 'Rich Life' | पुणे : 'समृद्ध जीवन'चे महेश मोतेवार पोलिसांच्या ताब्यात

पुणे : 'समृद्ध जीवन'चे महेश मोतेवार पोलिसांच्या ताब्यात

Next
>ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २८ - सेबीने निर्बंध लादल्यानंतरही लोकांकडून गुंतवणूक स्वीकारल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेले 'समृद्ध जीवन' कंपनीचे प्रमुख महेश मोतेवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उस्मानाबाद पोलिसांनी सोमवारी पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले. 
याप्रकरणी समृद्ध जीवन फूड्स कंपनीसह महेश किसन मोतेवार यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात  होता. या सदंर्भात सेबीने गेल्या महिन्यात डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्यात त्यांच्या सहकाऱ्यांनाही आरोपी केले. 
महेश किसन मोतेवार, वैशाली मोतेवार, घनश्याम पटेल आणि राजेंद्र भंडारे यांच्यासह समृद्ध जीवन फूड्स कंपनीविरुद्ध भादंवि ४२०, १८८, १२० ब नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी सेबीचे सहायक महाव्यवस्थापक सचिन ए. सोनवणे (रा. सेबी भवन, बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई) यांनी फिर्याद दिली होती. 
 
काय आहे प्रकरण :
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३१ ऑक्टोबर २०१३ रोजी सेबीने कंपनीला गुंतवणूक न घेण्याबाबत नोटीस बजावली होती. कंपनीमार्फत ‘कलेक्टिव्ह इन्व्हेस्टमेंट स्कीम’द्वारे लोकांकडून आर्थिक गुंतवणूक तसेच ठेवी घेण्यात येत होत्या़. अशा प्रकारची गुंतवणूक घेण्यासाठी सेबीची परवानगी आवश्यक असते. ही परवानगी समृद्ध जीवनने घेतलेली नव्हती. त्यामुळे गुंतवणूक थांबविण्याचे आदेश सेबीने दिले होते. मात्र तरीही कंपनीने गुंतवणूक घेणे सुरूच ठेवले होते. त्यामुळे सेबीने कंपनीची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान कंपनीचे आॅडिट बुक, अकाऊंट बुक ताब्यात घेतले होते. त्यात सेबीने बजावलेल्या आदेशाचे उल्लंघन करून लोकांकडून गुंतवणूक घेणे कंपनीने सुरूच ठेवल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे सेबीने या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे प्रमुख महेश मोतेवार यांनाच या गुन्ह्यामध्ये आरोपी करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे.

Web Title: Pune: In possession of Mahesh Motewar Police of 'Rich Life'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.