पुणे - द्रुतगती मार्गावर प्रवाशाला मारहाण करुन लुटले
By admin | Published: July 8, 2017 09:30 PM2017-07-08T21:30:44+5:302017-07-08T21:31:54+5:30
खासगी वाहनातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशाची द्रुतगती महामार्गावर किवळे येथे मारहाण करून लुबाडणूक करण्यात आली
Next
>ऑनलाइन लोकमत
वाकड (पुणे), दि. 8 - खासगी वाहनातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशाची द्रुतगती महामार्गावर किवळे येथे मारहाण करून लुबाडणूक करण्यात आली. ही घटना वाकड ते किवळे या हद्दीत घडली. प्रवाशाचे दागिने, रोख रक्कम लुटली, जबर मारहाण करून त्या जखमी अवस्थेत प्रवाशाला मोटारीतून खाली उतरविले. रात्री दीडच्या सुमारास जखमी अवस्थेत हा प्रवासी धडपडत किवळे येथे पोहोचला. तेथे गेल्यानंतर त्यांनी देहूरोड पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. देहूरोड पोलिसांनी फिर्याद दाखल केली़ अज्ञातांविरुद्ध दाखल झालेला हा गुन्हा दुसºया दिवशी हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
आणखी वाचा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव विशाल गोपीचंद आहुजा (वय ३४, रा. पिंपळे सौदागर) असे आहे. मुंबई-बंगळुरू द्रुतगती महमार्गावर वाकड ते किवळेच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घटना घडली. याबाबत देहूरोड पोलिसांनी स्थानिकांनी दिलेल्या माहिती वरून शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून ८ जुलैला हिंजवडी पोलिसांकडे वर्ग केला आहे. आहुजा काही कामानिमित्त सोमवारी एकच्या सुमारास मुंबईला निघाले होते़ वाकड पुलावर मुंबईला जाण्यासाठी थांबले असता एक मोटार तेथे थांबली. मुंबईला जायचे असेल तर मोटारीत बसा असे सांगून आहुजा यांना मोटारीत बसविले.
द्रुतगती मार्गावर निर्जनस्थळी येताच मोटार थांबविण्यात आली़ मोटारीतील व्यक्तींनी त्यांच्याकडील रोख रक्कम काढून घेतली. सोन्याचे दागिनेही घेतले. तीस हजार सातशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेत त्यांना मारहाण केली. अहुजा यांना द्रुतगती मार्गावर मध्येच सोडून लुटारू मोटारीतून मुंबईच्या दिशेने पसार झाले. अहुजा हे जखमी अवस्थेत ४ ते ५ किलोमीटर पायी चालत किवळेपर्यंत आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ते येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी देहूरोड पोलिसांकडे फिर्याद दिली. ८ जुलैला हा गुन्हा देहूरोड पोलीस ठाण्याकडून हिंजवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.