पुणे - तुर्कस्थानमध्ये गेलेला शालेय क्रीडा संघ सुखरुप

By admin | Published: July 16, 2016 04:17 PM2016-07-16T16:17:49+5:302016-07-16T17:02:30+5:30

तुर्कस्थानमध्ये झालेल्या लष्करी उठावाच्या पार्श्वभूमीवर येथे सुरू असलेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी गेलेला भारतीय संघ सुखरुप असल्याचे या संघातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले

Pune - The school sports team which went to Tarkashnut safely | पुणे - तुर्कस्थानमध्ये गेलेला शालेय क्रीडा संघ सुखरुप

पुणे - तुर्कस्थानमध्ये गेलेला शालेय क्रीडा संघ सुखरुप

Next
ऑनलाइन लोकमत - 
महाराष्ट्रातील १८ विद्यार्थी : गेम्सव्हिलेजमध्ये दुतावासातील अधिकारीही सोबत 
पुणे, दि. 16 - तुर्कस्थानमध्ये झालेल्या लष्करी उठावाच्या पार्श्वभूमीवर येथे सुरू असलेल्या जागतिक शालेय क्रीडा स्पर्धेसाठी गेलेला भारतीय संघ सुखरुप असल्याचे या संघातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी सांगितले. 
 
तुर्कस्थानमध्ये ११ ते १८ तारखेपर्यंत जागतिक शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून सुमारे १८ विद्यार्थी गेले आहेत. तुर्कस्थानमधील ट्रॅपझोन या शहरातील गेम्सव्हिलेजमध्ये या स्पर्धा सुरू आहेत. मात्र, शुक्रवारी येथे अचानक लष्करी उठाव झाला. यामुळे यादवीसदृश परिस्थिती निर्माण झाली. शनिवारी पहाटे हे वृत्त आल्यावर या विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये धास्ती निर्माण झाली होती. पुण्यातील एक पालक यांनी ट्विट करून या प्रकाराची माहिती दिली. त्याची तातडीने दखल घेऊन विदेश मंत्रालयाकडून याबाबतची सर्व माहिती घेण्यात आली. तुर्कस्थानच्या भारतीय दुतावासाचे फोन नंबरही देण्यात आले. त्यानंतर लगेचच तुर्कस्थानच्या दुतावासातून या पालकांना सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याचे कळविण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांना गेम्सझोनमध्येच थांबण्यास सांगण्यात आले आहे. 
 
दीपा आवटी- हिरे यांची कन्या सिध्दी अ‍ॅथलेटिक्ससाठी गेली आहे. त्यांनाही स्कूल गेम फेडरेशन ऑफ इंडियाच्या पदाधिका-यांनी सर्व विद्यार्थी सुखरुप असल्याचे कळविण्यात आले आहे. अ‍ॅथलेटिक्सचे प्रशिक्षक सुभाष पवार तेथे असून त्यांनीही सर्व पालकांशी संपर्क साधला आहे. पुण्यातील शैलेश मानकर यांचा मुलगा सुजय हा स्विमींग स्पर्धेसाठी तुर्कस्थानला गेला आहे. त्यांनाही आज सकाळी तुर्कस्थानहून जलतरणचे प्रशिक्षक साहू यांचा फोन आला. सुजयशीही त्यांचे बोलणे करून देण्यात आले. 
 
या स्पर्धांसाठी संपूर्ण देशातून विद्यार्थी गेले असून महाराष्ट्रातील १८ विद्यार्थी २ जुलै रोजी दिल्ली येथे शिबिरासाठी गेले. तेथूनच १० तारखेला हे विद्यार्थी तुर्कस्थानला गेले. १९ जुलै रोजी हे सर्व विद्यार्थी दिल्लीला पोहोचणार आहे. 
 
महाराष्ट्राचे संघ व्यवस्थापक राहुल कदम यांच्याशी ‘लोकमत’ने व्हॉटसअ‍ॅपद्वारे संपर्क साधला असता त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्तंबुल आणि अंकारा येथे तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. आम्ही तेथून १२०० किलोमीटर अंतरावरील शहरात असल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय संघातील सर्व जण सुखरुप असल्याची माहिती त्यांनी दिली. 
 

Web Title: Pune - The school sports team which went to Tarkashnut safely

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.