पुणे, शिवाजी विद्यापीठे ठरली देशात ‘ग्लोबल’
By admin | Published: November 3, 2016 07:57 PM2016-11-03T19:57:50+5:302016-11-03T19:57:50+5:30
सावित्रीबाई फुले पुणे आणि शिवाजी विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधनाच्या जोरावर देशातील उत्कृष्ट ग्लोबल विद्यापीठांच्या यादीत स्थान पटकाविले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 03 - सावित्रीबाई फुले पुणे आणि शिवाजी विद्यापीठाने गुणवत्तापूर्ण संशोधनाच्या जोरावर देशातील उत्कृष्ट ग्लोबल विद्यापीठांच्या यादीत स्थान पटकाविले आहे. यात पुणे विद्यापीठ हे १७ व्या, तर शिवाजी विद्यापीठ २१ व्या स्थानी आहे. अमेरिकेतील यू. एस. न्यूज अॅन्ड वर्ल्ड रिपोर्टने २८ आॅक्टोबरच्या अंकात संबंधित क्रमवारी जाहीर केली आहे.
क्रमवारी जाहीर झालेल्या संबंधित यादीत महाराष्ट्रातील पुणे विद्यापीठ आणि शिवाजी विद्यापीठाचाच समावेश आहे. विद्यापीठ अथवा शिक्षण संस्थेचे संशोधनातील कार्य, आशियासह जगातील शैक्षणिक वर्तुळातील त्या संस्थेची प्रतिमा, आदी निकषांवर ही निवड करण्यात आली आहे. पंजाब विद्यापीठ या क्रमवारीत प्रथम क्रमांकावर असून इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स हे द्वितीय, तर आयआयटी मुंबई तिसºया क्रमांकावर आहे.