पुणे, सोलापूर होणार स्मार्ट शहरे

By Admin | Published: January 28, 2016 03:32 PM2016-01-28T15:32:31+5:302016-01-28T16:00:19+5:30

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रथम विकसित करण्यात येणाऱ्या २० शहरांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

Pune, Solapur will be smart cities | पुणे, सोलापूर होणार स्मार्ट शहरे

पुणे, सोलापूर होणार स्मार्ट शहरे

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २८ - पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महत्त्वाकांक्षी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रथम विकसित करण्यात येणाऱ्या २० शहरांची घोषणा करण्यात आली असून यामध्ये महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर या शहरांचा समावेश करण्यात आला आहे. केंद्रीय मंत्री नगरविकास मंत्री वेंकय्या नायडू यांनी दिल्लीतील पत्रकार परीषदेत ही घोषणा केली आहे. स्मार्ट सिटीयोजनेत ९७ शहरांसाठी तब्बल ४८ हजार कोटी रुपये खर्चाची योजना आहे. राज्यांचे नगरविकास खाते स्मार्ट सिटी बनवतील. स्थानिक नागरी संस्थांच्या पातळीवर सर्व नियोजन आराखडे तयार करण्यात येतील. केंद्र सरकारच्या पातळीवर याबाबत कोणतीही गोष्ट करण्यात येणार नाही, असे केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी स्पष्ट केले. 


नायडू यांनी येथे पत्रकार परिषदेत स्मार्ट सिटी योजनेतील शहरांच्या नावांची घोषणा केली. 
नियोजन व विकास स्पर्धेतून शहरांची निवड करण्यात आली आहे. स्मार्ट सिटी योजनेत स्थान मिळविलेल्या विजेत्या शहरांनी सक्षम नियोजन व आराखडे तयार केले आहेत, असे त्यांनी सांगितले.

  • केंद्र सरकारने निवडलेली २० शहरे पुढीलप्रमाणे:
१ - भुवनेश्वर
२ - पुणे
३ - जयपूर
४ - कोची
५ - अहमदाबाद
६ - जबलपूर
७ - विशाखापट्टणम
८ - सोलापूर
९ - दावणगिरी
१० - इंदोर
११ - एनडीएमसी
१२ - कोइंबतूर
१३ - काकिनाडा
१४ - बेळगाव
१५ - उदयपूर
१६ - गुवाहाटी
१७ - सूरत
१८ - चेन्नई
१९ - लुधियाना
२० - भोपाळ
निवडलेल्या शहरांना पहिल्या दोन वर्षांत २०० कोटी रुपये, तर नंतरच्या तीन वर्षांत १०० कोटी रुपये दिले जाणार आहेत. पाच राज्यांच्या राजधानीच्या शहरांच्या समावेश आहे. २४ तास वीज आणि पाणी मिळणार उपलब्द करुन दिले जाणार आहे.

Web Title: Pune, Solapur will be smart cities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.