पुणे: बालकावर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक

By admin | Published: July 27, 2016 01:53 PM2016-07-27T13:53:44+5:302016-07-27T15:44:07+5:30

खाऊचे आमिष दाखवून ७ वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यात घडली आहे.

Pune: Stuck to Sexual Harassment on Child | पुणे: बालकावर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक

पुणे: बालकावर लैंगिक अत्याचार करणा-यास अटक

Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २७ -  उत्तमनगरमध्ये खाऊचे आमिष दाखवून ७ वर्षाच्या चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार  केल्याची घटना उघडकीस आली आहे. बालकावर उत्तमनगरमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून, अत्याचार करणारा उमेश विष्णू जाधव (वय. २७, सध्या रा. उत्तमनगर, मूळ- कुडूर्वाडी, सोलापूर) याला उत्तमनगर पोलिसांनी अटक केले आहे.दिलेल्या माहिततीनुसार, या घटनेतील पिडीत मुलगा, त्याची आई आणि आजीसमवेत उत्तमनगर मधील एका बांधकाम प्रकल्प स्थळावर रहातो. त्याची आई आणि आजी तेथे काम करतात.
 
अत्याचार करणारा नराधम उमेश जाधव देखील त्याच बांधकाम स्थळावर रहातो. हे सर्वजण इमारतीच्या पार्किंग मध्ये पत्र्याचे शेड मारून तयार करण्यात आलेल्या लेबर कॅम्प मध्ये राहतात. मंगळवारी रात्री साडेआठ वाजता, आरोपीने पिडीत मुलास खाऊचे आमिष दाखवून, घरात बोलावून घेतले. त्याच्यावर अत्याचार केला.  घरी गेलेल्या मुलाचे कपडे खराब झाले होते, ओठ सुजलेले होते, डोक्याला जखम झालेली पाहून आईने काय झाले म्हणून विचारले असता, मुलाने हकीकत सांगितली.  भेदरलेल्या त्या मुलाच्या आईने तातडीने मुलास उपचारार्थ रुग्णालयात हलवले. त्याच्यावर उत्तमनगर मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
 
घटनेचे गांभीर्य ओळखून रुग्णालयाने उत्तमनगर पोलिसांनी तातडीने पोलीस  उपायुक्त सुधीर हिरेमठ यांना याबाबत कळविले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, सहायक पोलीस आयुक्त तुकाराम गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजय देशमुख यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन, पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडले. त्याच्यावर बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा  दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक कोंडीभाऊ जाधव पुढील तपास करत आहेत. 
 

Web Title: Pune: Stuck to Sexual Harassment on Child

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.