पुण्यात पोलीस बँड गणेशाला सलामी देणार
By admin | Published: August 29, 2014 03:09 AM2014-08-29T03:09:23+5:302014-08-29T03:09:23+5:30
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे दरवर्षी रूट मार्च काढण्यात येतो. परंतु शुक्रवारी बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने अलका टॉकीज चौकापर्यंत पोलिसांचा पाईप बँड वाजत गाजत जाणार आहे
पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांतर्फे दरवर्षी रूट मार्च काढण्यात येतो. परंतु शुक्रवारी बेलबाग चौकातून लक्ष्मी रस्त्याने अलका टॉकीज चौकापर्यंत पोलिसांचा पाईप बँड वाजत गाजत जाणार आहे.
गणेशोत्सव शांततामय आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडावा, यासाठी हा उपक्रम हाती घेतल्याची माहिती पोलीस आयुक्त सतीश माथुर यांनी दिली. हडपसर आणि कोंढव्यातील हिंसाचार, फरासखाना बॉम्बस्फोट या घटनांच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या गणेशोत्सवामध्ये शांतता प्रस्थापित करणे, पोलिसांसमोरचे मुख्य आव्हान आहे. पोलिसांनी मंडळांच्या बैठका घेऊन तसेच नागरिकांशी संवाद साधून आवश्यक सूचना दिलेल्या आहेत. पोलिसांना नेहमीच्या पोलीस बँडसोबत राज्य राखीव दलाचा विशेष पाईप बँड पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. (प्रतिनिधी)