पुण्यात भारनियमन सुरू, ऐन सणासुणीत काळात पुणेकर राहणार अंधारात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 10:36 PM2017-10-05T22:36:02+5:302017-10-05T22:36:23+5:30

राज्यात वीजनिर्मितीत घट झाल्याने त्याचा फटका गेली 12 वर्षे भारनियमनमुक्त असलेल्या पुणे शहराला गुरुवारी बसला. शहराच्या अनेक भागात आज 2 - 2 भारनियमन करण्यात आले.

Pune will continue to get loaded, Pune will remain in dark in the festive season | पुण्यात भारनियमन सुरू, ऐन सणासुणीत काळात पुणेकर राहणार अंधारात

पुण्यात भारनियमन सुरू, ऐन सणासुणीत काळात पुणेकर राहणार अंधारात

Next

पुणे : राज्यात वीजनिर्मितीत घट झाल्याने त्याचा फटका गेली 12 वर्षे भारनियमनमुक्त असलेल्या पुणे शहराला गुरुवारी बसला. शहराच्या अनेक भागात आज 2 - 2 भारनियमन करण्यात आले. पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून भारनियमन केले जात आहे. मात्र पुणे शहर व पिंपरी चिंचवड हे ए व बी गटात येत असल्याने तेथे भारनियमन केले जात नव्हते. पुणे शहरात विविध भागात दोन -दोन तासांचे भारनियमन करण्यात येत होते. मात्र, अधिकृतपणे देखभाल, दुरुस्तीचे नाव दिले जात होते़ पुणे शहरात हे भारनियमन उद्याही सुरु राहण्याची शक्यता आहे.
सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले,  कोळसा पुरवठ्यात अडथळा आल्याने वीजनिर्मिती घटल्याचे जेव्हा सांगितले जाऊ लागले, तेव्हाच आपण केंद्रीय कोळसा मंत्रालयाला मेल करून त्याबाबतची वस्तुस्थिती काय याची विचारणा केली होती. कोळशाचा पुरवठा कधी सुरळीत यावर काहीही माहिती देण्यास तयार नाहीत. 

१२ वर्षांनंतर पुणे शहरात भारनियमन
पुणे शहरात सुरळीत व अखंड वीजपुरवठा सुरु रहावा, यासाठी २००५ मध्ये पुणे मॉडेल विकसित करण्यात आले होते. त्यासाठी पुणेकरांनी जादा दरही मोजला होता. औद्योगिक संस्थांना जेनरेटरवर वीजनिर्मिती करायला सांगून त्यांना त्यासाठी येणारा जादा खर्च पुणेकर बिलाद्वारे देत होते. या पुणे मॉडेलमुळे २००५ ते २०१० पर्यंत पुणे शहर भारनियमनमुक्त राहिले होते. त्यानंतर आता तब्बल १२ वर्षांनंतर पुणे शहरात भारनियमन होत आहे. ऐन दिवाळीतही पुणेकरांना भारनियमन सहन करावे लागण्याची शक्यता आहे. 

आता तरी खरे सांगा
एका बाजूला पंतप्रधान देशभरातील सर्व घरांमध्ये १६ हजार मेगावॉट वीज पुरविण्याची घोषणा करतात, त्याचवेळी देशभरात सर्वाधिक वीजेचा दर देऊनही लोकांना भारनियमन सहन करायची पाळी येत आहे, याला नेमके जबाबदार कोण?. वीजनिर्मिती कशामुळे घटली, याला नेमके जबाबदार कोण हे पारदर्शक कारभाराची भाषा करणा-या सरकारने जनतेला स्पष्टपणे सांगितले पाहिजे. परंतु केंद्र सरकारमधील कोळसा मंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री यावर काहीही बोलायला तयार नाही. 
विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच
ससून रुग्णालयामध्येही साडेतीन तासांचे भारनियमन करावे लागल्यामुळे त्याचा फटका रुग्णसेवेला बसत आहे. येथे बाह्यरुग्ण आणि दाखल रुग्णांची संख्या मोठी आहे. सुमारे 1300 खाटांच्या या रुग्णालयात अनेकदा क्षमतेपेक्षाही अधिक रुग्ण दाखल असतात. विजेअभावी शस्त्रक्रिया, एमआरआय, सिटीस्कॅन ही यंत्रणा बंद पडते. आधीच या यंत्रणेवर मोठा ताण असून त्यात भारनियमनामुळे एमआरआय व सिटीस्कॅन बंद पडणार असेल तर येथील रुग्णसेवा संपूर्ण कोसळून जाईल, अशी भीती बी. जे. वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी व्यक्त केली. ससून रुग्णालयात 29 ऑपरेशन थिएटर आहेत. येथे विविध प्रकारच्या दररोज सरासरी 180 ऑपरेशन होतात. मेडिसिन अतिदक्षता विभाग, ट्रामा आयसीयू, एनआयसीयू, पीआयसीयू, स्त्रीरोग अतिदक्षता कक्ष, सीव्हीटीएस आयसीयू यामध्ये सुमारे सव्वाशे खाटा असून त्यात 61 व्हेंटिलेटर्स आहेत. अनेक महागडी उपकरणे ही वीज पुरवठ्यावर अवलंबून असतात. उपचारासाठी येणार्‍या रुग्णांचे निदान करण्यासाठी अखंडित वीजपुरवठा गरजेचा आहे. त्यामुळे ससून रुग्णालयासाठी एक्स्प्रेस फिडरमधून वीजपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी डॉ. चंदनवाले यांनी केली आहे.

Web Title: Pune will continue to get loaded, Pune will remain in dark in the festive season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.