पुण्यात आई-मुलांना गाडीखाली चिरडणा-या "त्या" महिलेला जामीन

By admin | Published: April 18, 2017 08:25 PM2017-04-18T20:25:01+5:302017-04-18T21:05:41+5:30

बाणेर येथे दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांना भरधाव वेगाने मोटार चालवित भीषण धडक दिल्याप्रकरणी कारचालक महिला सुजाता जयप्रकाश श्रॉफ

In Pune, the "woman" who was caught crushing her under the car, will be arrested | पुण्यात आई-मुलांना गाडीखाली चिरडणा-या "त्या" महिलेला जामीन

पुण्यात आई-मुलांना गाडीखाली चिरडणा-या "त्या" महिलेला जामीन

Next

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. 18 - बाणेर येथे दुभाजकावर उभ्या असलेल्या पाच जणांना भरधाव  वेगाने मोटार चालवित भीषण धडक दिल्याप्रकरणी कारचालक महिला सुजाता जयप्रकाश श्रॉफ ( रा. शिवाजीनगर) हिला अटक करून चतु:श्रृंगी  पोलिसांनी मंगळवारी शिवाजीनगर न्यायालयात हजर केले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी यांच्या न्यायालयाने 15 हजार रूपयांच्या जातमुचचलक्यावर आरोपी श्रॉफ हिची जामीनावर सुटका केली .

दरम्यान, सर्वांचीच झोप उडविणा-या या अपघातात एका तीन वर्षांच्या बालिकेचा घटनास्थळीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर उपचारादरम्यान तिची आई पूजा अजयकुमार विश्वकर्मा ( वय 24) हिचा सोमवारी उशीरा मृत्यू झाला आहे. श्रॉफ ही एका बांधकाम व्यावसायिकाची पत्नी आहे. सोमवारी दुपारी श्रॉफ हिच्या कारने दुभाजकावर थांबलेल्या पाच जणांना जोरदार धडक दिली. या घटनेत विश्वकर्मा मायलेकींचा मृत्यू झाला असून, सय्यद अली (25), निशा शेख ( 24), साजिद शाहिद शेख (4) हे गंभीर जखमी झाले आहेत. साजिद या बालकावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. अपघातानंतर ही महिला पळून गेली. सायकाळनंतर शहरातील एका खाजगी हॉस्पीटलमध्ये ती दाखल झाली. निष्काळजीपणाने कार चालविल्याप्रकरणी मंगळवारी सकाळी 9 वाजता तिला अटक करण्यात आली आणि त्यानंतर दुपारी 3 वाजता तिला न्यायालयात हजर करण्यात आले. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समता चौधरी न्यायालयाने 15 हजार रूपयांच्या जामीनावर तिची सुटका केली.  याप्रकरणाचा चतु:शृंगी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक याप्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.
 

Web Title: In Pune, the "woman" who was caught crushing her under the car, will be arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.