टेनिस विश्वात पडणार ‘पुणेरी’ छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 03:45 AM2017-07-21T03:45:00+5:302017-07-21T03:45:00+5:30

भारतातील एकमेव एटीपी स्पर्धा असलेली ‘चेन्नई ओपन’ पुढील वर्षापासून पुण्यामध्ये खेळविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षापासून ही स्पर्धा ‘महाराष्ट्र ओपन’

'Punei' marks in tennis world | टेनिस विश्वात पडणार ‘पुणेरी’ छाप

टेनिस विश्वात पडणार ‘पुणेरी’ छाप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : भारतातील एकमेव एटीपी स्पर्धा असलेली ‘चेन्नई ओपन’ पुढील वर्षापासून पुण्यामध्ये खेळविण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, पुढील वर्षापासून ही स्पर्धा ‘महाराष्ट्र ओपन’ नावाने ओळखली जाणार असून, आता जागतिक टेनिसमध्ये महाराष्ट्राचे नाव चमकताना दिसेल. दरम्यान, सध्या ही स्पर्धा पुढील पाच वर्षांपर्यंत पुण्यात खेळविण्यात येईल, अशी माहिती एमएसएलटीएचे सचिव सुंदर अय्यर यांनी दिली.
भारताच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा वेळापत्रकामध्ये मानाचे स्थान मिळवलेल्या चेन्नई ओपनमध्ये गेल्या २१ वर्षांत जगातील अनेक आघाडीच्या खेळाडूंनी आपले कौशल्य दाखवले आहे.
विशेष म्हणजे, १५ ग्रँडस्लॅम विजेता असलेला स्पेनचा राफेल नदालनेही या स्पर्धेत आपली चमक दाखवली असून जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान पटकावण्याच्या प्रवासामध्ये त्याने ही स्पर्धा महत्त्वाची असल्याचे म्हटले होते. तसेच, अनेक खेळाडूंनी नव्या मोसमातील आपली पहिली स्पर्धा म्हणून या स्पर्धेला महत्त्व दिले आहे.
तसेच, या मानाच्या स्पर्धेचे यजमानपद मिळाल्यानंतर महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेचे (एमएसएलटीए) सचिव सुंदर अय्यर आणि स्पर्धा निर्देशक प्रशांत सुतार यांनीही आनंद व्यक्त केला.

जागतिक दर्जाच्या एटीपी स्पर्धेचे आम्ही आमच्या राज्यात स्वागत करतो. महाराष्ट्र ओपनच्या यजमानपदाचा आम्हाला अभिमान आहे. तसेच, प्रत्येक वर्षी या स्पर्धेत अव्वल दर्जाच्या खेळाडूंना निमंत्रित करुन, या स्पर्धेचा दर्जा आणखी उंचावू, असा विश्वास आम्ही देतो.
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

चेन्नईमधून ही स्पर्धा बाहेर हलविण्याचा विचार सुरूच होता. तसेच स्पर्धा आयोजक ही स्पर्धा भारताबाहेर नेण्याचाही विचार सुरू होता. परंतु, मिळणारा प्रतिसाद पाहता ही स्पर्धा भारतातच होणे आवश्यक होते आणि त्यासाठी आम्ही पुढाकार घेतला. तसेच, ५ वर्षांनंतरही ही स्पर्धा महाराष्ट्रातच आयोजित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शिवाय, स्पर्धेमुळे महाराष्ट्राचे नाव एटीपी टेनिस वेळापत्रकामध्ये येणार असल्याचा अभिमान आहे. या स्पर्धेत जागतिक स्तरावरील अव्वल खेळाडूंना महाराष्ट्रात निमंत्रित करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
- सुंदर अय्यर, सचिव एमएसएलटीए

Web Title: 'Punei' marks in tennis world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.