पुणेकरांना मिळकतकर सवलत नाहीच

By Admin | Published: August 10, 2016 01:48 AM2016-08-10T01:48:11+5:302016-08-10T01:48:11+5:30

मुंबई महापालिकेप्रमाणेच पुण्यातही ५०० किंवा त्यापेक्षा कमी स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या सदनिकांचा मिळकतकर रद्द करण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविल्याने त्याबाबतचा

Puneites do not get any tax relief | पुणेकरांना मिळकतकर सवलत नाहीच

पुणेकरांना मिळकतकर सवलत नाहीच

googlenewsNext

पुणे : मुंबई महापालिकेप्रमाणेच पुण्यातही ५०० किंवा त्यापेक्षा कमी स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या सदनिकांचा मिळकतकर रद्द करण्यास प्रशासनाने असमर्थता दर्शविल्याने त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीने फेटाळून लावला आहे.
मुंबई महापालिकेने ५०० किंवा त्यापेक्षा कमी स्क्वेअर फूट क्षेत्रफळाच्या सदनिकांचा मिळकतकर रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यातही पाचशे चौरस फूट किंवा त्यापेक्षा कमी स्क्वेअर फुटाच्या सदनिकाधारकांकडून मिळकतकर घेऊ नये असा प्रस्ताव नगरसेवक संजय बालगुडे यांनी स्थायी समितीला दिला होता.
छोट्या घरांमध्ये प्रामुख्याने गरीब कुटुंबीय राहात असल्याने त्यांना ही सवलत देण्याची मागणी बालगुडे यांनी केली होती. स्थायी समितीने यावर प्रशासनाचा अभिप्राय मागितला होता.

Web Title: Puneites do not get any tax relief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.