'चला जाऊ घरोघरी, नाही तर वाजलेच बारा’; कार्यकर्त्यांचा पुणेरी ठेका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2019 02:13 PM2019-04-22T14:13:41+5:302019-04-22T18:57:12+5:30

निवडणुकीचा फड आता कसा ऐन रंगात आलाय. अशा या रंगलेल्या वातावरणात फक्कड लावणी झालीच पाहिजे नाही का? ...वाजव रे ती ढोलकी...तर ऐका.....

PUNERI MISAL: ... or LAWANI OF ' BARA' only! | 'चला जाऊ घरोघरी, नाही तर वाजलेच बारा’; कार्यकर्त्यांचा पुणेरी ठेका

'चला जाऊ घरोघरी, नाही तर वाजलेच बारा’; कार्यकर्त्यांचा पुणेरी ठेका

Next

- अभय नरहर जोशी-  

(चाल : सुप्रसिद्ध लावणी - आता वाजले की बारा)
कार्यकर्ते : 
निवडणुकीचा मोसम कसा आलाय भरात
धड धड नेत्यांच्या काळजात मायेना
फिरायचं कवा, कुठं, कसं आम्ही झालो येडपिसं
त्याचा नाही भरवसा, रात्री ‘तोल’ राहीना

राखिली की मर्जी ‘त्यांनी’, तिकीट मिळाले
प्रचारात रंगुनि घामानं चिंब ओले सर्व झाले
टीका केली जपून तरी काळ-येळ नाही बरी
रात्री ‘बसू’, खाऊ थोडा तरी चखणा

चला जाऊ घरोघरी
नाही तर वाजलेच ‘बारा’     ।।धृ।।

मतदार (कोरसमध्ये) : 
हे कशापायी छळता, मागं मागं फिरता
असं काय करता, 
सारखं काय येता हो आमच्या दारी
याची बी रॅली गेली, त्याचीसुद्धा रॅली गेली 
आता सभेसाठी गाडी निघाली

कार्यकर्ते : 
चला जाऊ घरोघरी
नाही तर वाजलेच ‘बारा’     ।।१।।

उमेदवार :
याचक म्हणून आम्ही उभे मतदारांच्या उंबºयात
खुर्चीचं हे येडं स्वप्न बाळगलं उरात
पराभवाचं भय घाली निवडणूक ही चुरशीची
उगा गडबड कशापायी, हाये नजर आयोगाची
राजा रे, राणी गं, हाये नजर आयोगाची
विजय करण्या पक्का आपला, 
करू ताकद गोळा शीळ घाली ‘तिकडून’ कोणी करून तिरपा डोळा आता कार्यकर्ते कसे झाकू, सांगा कुठवर राखू याचं भान माझं मला राहिना
कार्यकर्ते : 
चला जाऊ घरोघरी
नाही तर वाजलेच ‘बारा’     ।।२।।

मतदार (कोरसमध्ये) : 
हे कशापायी छळता, मागं मागं फिरता
असं काय करता, 
सारखं काय येता हो आमच्या दारी
याची बी रॅली गेली, त्याचीसुद्धा रॅली गेली 
आता सभेसाठी गाडी ही निघाली...

उमेदवार :
प्रचारानं घेतला वेग, 
सभा होती चौकाचौकांत
तप्त उन अंग जाळी, आवाज फुटना व्हटात
कार्यकर्ते काही द्वाड, गोटात माझ्या राहिना
प्रचाराच्या डावपेचाचं मी कसं गुपित राखू कळंना हे .. राजा रं, रानी ग कसं गुपित राखू कळंना मोरावानी डौल माझा गरुडावानी तोरा
इलेक्शनला यंदा केला धीर गोळा 
निवडणुकीची लागलीया गोडी 
तरी कळ काढा थोडी
घडी ही कसोटीची निभवूया...

कार्यकर्ते : 
चला जाऊ घरोघरी
नाही तर वाजलेच ‘बारा’     ।।३।। 

Web Title: PUNERI MISAL: ... or LAWANI OF ' BARA' only!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.