पुणेरी पगडीसोबत म्हणा, ‘मी पुणेकर’
By admin | Published: August 30, 2016 01:13 AM2016-08-30T01:13:55+5:302016-08-30T01:13:55+5:30
तुमच्या गौरवाचा हा क्षण चिरंतन ठेवण्यासाठी पुण्यातील नंबर १ चे वृत्तपत्र ‘लोकमत’तर्फे ‘मी पुणेकर’ या खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणाच्या निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा होत आहे.
पुणे : खास पुणेकरांचा पुणेरी बाणा पगडीमध्ये आणखीनच खुलून उठतो. पगडी परिधान केल्यावर जाज्वल्य अभिमानही वाटतो. तुमच्या गौरवाचा हा क्षण चिरंतन ठेवण्यासाठी पुण्यातील नंबर १ चे वृत्तपत्र ‘लोकमत’तर्फे ‘मी पुणेकर’ या खास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. श्रावणाच्या निसर्गरम्य वातावरणात ही स्पर्धा होत आहे.
तळ्यातला गणपती, शनिवारवाडा, बाकरवडी ही जशी पुण्याची वैविध्यपूर्ण वैशिष्ट्ये आहेत, तशीच ‘पुणेरी पगडी’ हीदेखील पुणेकरांसाठी गौरवाची गोष्ट आहे ! ही पुण्याच्या प्रतिष्ठेची पगडी एकदा तरी मस्तकावर परिधान करावी, अशी प्रत्येक पुणेकराची मनापासून इच्छा असते. महाराष्ट्राबरोबर पुण्यातही नंबर १ चे बिरुद मिळविलेल्या ‘लोकमत’ने तुमच्या या इच्छेला आणखी बळ मिळावे, यासाठी या अभूतपूर्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.
करायचे आहे फक्त एकच, तुमचा पगडी परिधान केलेला फोटो आम्हाला 9011029181 या क्रमांकावर व्हॉट्सअॅप करा किंवा mipunekar@lokmat.com ईमेल पाठवा
निवडक छायाचित्रांना लोकमतमध्ये प्रसिद्धी दिली जाईल. लकी ड्रॉद्वारे निवडलेल्या सर्वोत्कृष्ट छायाचित्रांना ‘लोकमत’तर्फे आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.चला तर, एका क्लिकवर अभिमानाने म्हणू या, ‘मी पुणेकर’!