पुणे गेलं पाण्यात.. पावसाळी कामेच न झाल्याने शहरात साचली पाण्याची तळी
By admin | Published: May 14, 2014 07:48 PM2014-05-14T19:48:45+5:302014-05-15T04:49:42+5:30
पुणे : पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असतानाही सुस्तावलेल्या पालिका प्रशासनाची सुस्ती आज शहरात झालेल्या तासाभराच्या अवकाळी पावसाने उतरविली. पावसाळी पाणी वाहून जाण्यासाठीच्या जागेवर साठलेले पाण्याचे ढीग, मोठया प्रमाणात माती वाहून आल्याने तुंबलेल्या पावसाळी वाहिन्या आणि सिमेंटच्या रस्त्यांमुळे पाणी वाहून जाण्यास जागाच नसल्याने शहरातील जवळपास सर्व चौक आणि सखल भागांमध्ये तीन ते चारफूट पाण्याची तळी साचली होती. त्यामुळे नागरिकांची तारांबळतर उडालीच मात्र या पाण्यामुळे चौका चौकात झालेल्या वाहतूक कोंडीचा मनस्तापही पुणेकरांना सहन करावा लागला.

शहरात गेल्या सहा महिन्यांपासून सीसीटीव्ही केबल, पालिकेच्या पाणी पुरवठा, डे्रणेज तसेच पावसाळी लाईन्स आणि सिमेंट रस्त्यांसाठी मोठया प्रमाणात खोदाई करण्यात आली आहे. प्रामुख्याने खोदाई रस्त्यांच्या कडेला करण्यात आली आहे. त्यामुळे मातीचे ढीग रस्त्याच्या कडेस साचलेले होते. काम पूर्ण होताच या ठिकाणची माती उचलून हे रस्ते पुन्हा तत्काळ पूर्ववत करणे आवश्यक होते. मात्र, दरवर्षी प्रमाणे यंदाही पावसाळा उशीरा सुरू होणार यामुळे प्रशासनाने त्याकडे जाणून बुजून दूर्लक्ष केल्याने त्याचा फटका आज पुणेकरांना सहन करावा लागला. आज झालेल्या मुसळाधार पावसाने ही रस्त्याच्या कडेची माती पाण्याबरोबर वाहत जावून या मातीने सर्व प्रथम पावसाळी गटारे तुंबली त्यातच पावसाळी गटारांची स्वच्छताही न झाल्याने अनेक ठिकाणी या गटारांमधून पाणी बाहेर येत होते. या पाण्याचा वेग इतका जास्त होता की सुमारे तीन ते चार फूट उंच या पाण्याचे फवारे उडत होते.
----------------------------
चौका चौकात पाण्याची तळी
शहरातील पावसाळापूर्व कामे 90 टक्क्याहून अधिक पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाकडून करण्यात येत होता. मात्र हा दावा फोल ठरल्याचे आज झालेल्या पावसाने दिसून आले. पाऊस सुरू होताच अवघ्या काही मिनिटातच सखल भागात पाणीसाचण्यास सुरूवात झाली. मात्र, पाणी जाण्यास जागाच नसल्याने काही मिनिटातच टिळक चौक, खंडेजीबाबा चौक, डेक्कन बसथांबा, स्वारगेट चौक, कार्वेपुतळा चौक, अप्पा बळवंत चौक,कृषी महाविद्यालय चौक, विद्यापीठ चौक, कर्वेरस्ता परिसर,नगररस्ता परिसर, टिळक रस्त्यावर अनेक ठिकाणी , राजाराम पूल, पू.ल देशपांडे उद्यान परिसरातील रस्त्यासह सर्व प्रमुख चौकांमध्ये पाण्याची तळी साचली त्यामुळे नागरिकांना आपली वाहने काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली लागली.