पुण्याचा कचरा अखेर मोशीत जिरणार

By admin | Published: September 13, 2014 11:18 PM2014-09-13T23:18:55+5:302014-09-13T23:18:55+5:30

पुणो शहरातील कचरा आता पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीजवळील मोशी गावातील खाणीमध्ये जिरविला जाणार आहे.

Pune's garbage will finally be harvested | पुण्याचा कचरा अखेर मोशीत जिरणार

पुण्याचा कचरा अखेर मोशीत जिरणार

Next
सुनील राऊत  - पुणो
पुणो शहरातील कचरा आता  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीजवळील मोशी गावातील खाणीमध्ये जिरविला जाणार आहे. त्यासाठीची 25 हेक्टर जागा महापालिका प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाने निश्चित केली असून, या जागेसाठीचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून लवकरच राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.  याच जागेजवळ पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कचराप्रक्रिया प्रकल्प आहे. 
 
पुणो शहरातील कचरा जिरविण्यासाठी महापालिकेने शोधलेल्या खाणींचे पर्यायही उपयुक्त ठरले नाहीत.  त्यामुळे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने नवीन जागांचा शोध सुरू केला होता. ही शोध मोहीम अखेर संपली आहे.  पुणो शहरात दररोज निर्माण होणारा कचरा उरूळी देवाची येथील कचराडेपो मध्ये जिरविण्यात येतो. मात्र, या ठिकाणचा कचराडेपो बंद करावा या मागणीसाठी उरूळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थांनी विरोध करीत ऐन विधानसभेच्या तोंडावर कचराबंद आंदोलन छेडले होते. या आंदोलनाची दखल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही घेतली होती. 31 डिसेंबर र्पयत महापालिका कचरा जिरविण्यासाठी पर्यायी प्रकल्प उभारेल.  त्यानंतर या डेपो मध्ये कचरा आणला जाणार नाही असे आश्वासन ग्रामस्थांना दिले होते. या पाश्र्वभूमीवर महापालिकेकडून गेल्या दोन महिन्यांपासून शास्त्रिय पध्दतीने भू-भराव ( सायंटीफीक लँन्डफिलींग)  घालून खाणींमध्ये जिरविण्यासाठी खाणींचा शोध घेतला जात होता. त्यासाठी पाच खाणी अंतिमही करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यातील केवळ एकच खाण या प्रकल्पासाठी उपयुक्त असल्याने महापालिका तसेच जिल्हा प्रशासनाने इतर शासकीय जागांचा शोध घेण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, पुण्याचा कचरा जिरवण्यासाठी धायरी, शिंदवणो घाट येथील जागांचीही पाहणी करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
 
महापालिकेसाठी तीन महिन्यांचा अल्टिमेटम 
4उरूळी देवाची येथील कचरा डेपो 31 डिसेंबर नंतर बंद करण्याचे आश्वासन दस्तुरखुद्द मुख्यमंत्री चव्हाण यांनीच दिल्याने महापालिकेस त्या पूर्वीच शहरातील कच-याचे नियोजन करावे लागणार आहे. गेले दोन महिने खाणी शोधण्यातच गेले आहेत. तर या दोन महिन्यात एकाही नवीन प्रकल्पासाठी हालचाल झालेली नाही. त्यामुळे पालिकेच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. त्यातच विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता सुरू झाल्याने महापालिकेचे या कामातील मनुष्यबळही निवडणूकीच्या कामात गुंतणार आहे. त्यामुळे पुढील तीन महिन्यात महापालिकेस कचरा निर्मूलनासाठी पर्याय उभे न करता आल्यास शहरात कच-याची गंभीर समस्या निर्माण होणार आहे.
 
मोशीमधील शासकीय खाणीची जागा निश्चित 
4मोशी येथे पिंपरी-चिंचवड महापालिकेचा कचरा शास्त्रीय पध्दतीने कँपींग केला जातो. या प्रकल्पाच्या जवळच शासनाच्या मालकीची तब्बल साडेचारशे ते पाचशे एकराची खाण आहे. 
4या मधील तब्बल 77 हेक्टर जागा पुणो महापालिकेने कचरा जिरविण्यासाठी मागितली होती. मात्र, या जागेचे मुल्य तब्बल 12क् कोटी रूपये जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले. ते महापालिकेस परवडणारे नसल्याने आता पालिकेने या जागेतील सुमारे 25 हेक्टर जागेचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास पाठविला आहे. 
4हा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडून विभागीय आयुक्तांच्या माध्यमातून लवकरच राज्यशासनाकडे पाठविण्यात येणार आहे, ही जागा जास्त असल्याने ती देण्याचा अधिकार जिल्हाधिका-यांना नसल्याने तो शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.
 
शास्त्रीय पद्धतीने जिरविणार कचरा 
4मोशी येथील खाणींमध्ये महापालिकेकडून जिरविण्यात येणारा कचरा शास्त्रीय पध्दतीने भूभराव टाकून जिरविण्यात येणार आहे. त्यासाठी मोठा खर्च येणार असला तरी, या कच-यामुळे जलस्त्रोत दूषीत होणार नाहीत.  तसेच परिसरात दरूगधी पसरणार नाही याची विशेष दक्षता घेतली जाणार आहे. तसेच निर्माण होणा-या लिचेटसाठीही स्वतंत्र प्रक्रीया प्रकल्प उभारला जाणार आहे. त्यासाठी आधी या खाणी सिमेंटने खालून बंद केल्या जाणार असून नंतर त्यांच्या बाजूच्या भिंती रिटेनिंग वॉलद्वारे बंद केल्या जाणार आहेत. त्यानंतर मुरूम, माती आणि कच-याचा थर टाकून त्यातील कचरा जिरविला जाणार आहे. 
 
4पुणो शहरातील दररोज गोळा होणारा हजारो टन कचरा टाकायचा कोठे असा प्रश्न महापलिकेपुढे निर्माण झाला होता. त्यासाठी गेले वर्षभर महापालिकेतर्फे विविध जागांचीपाहणी करण्यात आली होती. पुणो शहर परिसर जागांबरोबर जिल्ह्यातील काही ठिकाणांची पाहणी समितीने केली होती. मात्र त्यासाटी ग्रामस्थांनी प्रखर विरोध 
केला होता. 

 

Web Title: Pune's garbage will finally be harvested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.