पुण्याच्या सायली शेंडगेची यशोगाथा, अवघ्या २७ व्या वर्षी न्यायाधीशपदी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 02:44 AM2018-02-28T02:44:29+5:302018-02-28T02:44:29+5:30

पहिल्या प्रयत्नात केवळ एका गुणामुळे हुकलेले न्यायाधीशपद आणि घरची असलेली प्रतिकुल परिस्थिती...या अवस्थेतही तिने जिद्द सोडली नाही.

 Pune's Shelley Shendge's success story, just 27 years old judge! | पुण्याच्या सायली शेंडगेची यशोगाथा, अवघ्या २७ व्या वर्षी न्यायाधीशपदी !

पुण्याच्या सायली शेंडगेची यशोगाथा, अवघ्या २७ व्या वर्षी न्यायाधीशपदी !

googlenewsNext

पुणे : पहिल्या प्रयत्नात केवळ एका गुणामुळे हुकलेले न्यायाधीशपद आणि घरची असलेली प्रतिकुल परिस्थिती...या अवस्थेतही तिने जिद्द सोडली नाही. न्यायाधीश व्हायचंच हे तिने मनाला पक्कं ठरवलं होतं. त्या दृष्टीने ती अभ्यास करीत होती. अखेर तिच्या प्रयत्नांना यश आले आणि दुसºया प्रयत्नात ती यशस्वी झाली आणि प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी परीक्षेत १४ वी आली. आता ती न्यायाधीश होणार असून, तिने हे यश केवळ २७ व्या वर्षी मिळविले आहे. त्यांचे नाव आहे सायली शेंडगे.
एवढ्या कमी वयात न्यायाधीश होण्याची बहुतेक ही दुर्मिळ घटना म्हणावी लागेल. पुण्यातील दत्तवाडी भागात सायली राहतात. सर्वसामान्य घरात सायली यांचा जन्म झाला. त्यांच्या घरी कायद्या क्षेत्राची कसलीही पार्श्वभूमी नाही. वडील अशोक शेंडगे शिवणकाम करतात आणि आई जयश्री गृहिणी आहेत. दोन विवाहित बहिणी असून सायली ही धाकटी. गेली अडीच वर्षे ती जिल्हा सत्र न्यायालयात वकील म्हणून व्यवसाय करत होती. वकिली करीत असताना न्यायाधीशपदी जायचे स्वप्न सत्यात उतरले आहे.
सकारात्मक दृष्टिकोन ठेवा
माझ्या घरामध्ये मी पहिलीच वकील आहे. या क्षेत्रामध्ये जायचे ठरवले, तेव्हाच मी न्यायाधीश व्हायचं ठरवले होते. सकारात्मक दृष्टीकोन ठेवून प्रयत्न केल्यास यश नक्की मिळतेच. - सायली शेंडगे

Web Title:  Pune's Shelley Shendge's success story, just 27 years old judge!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.