पुण्याचे तापमान सरासरीच्या खाली
By admin | Published: May 26, 2015 01:15 AM2015-05-26T01:15:38+5:302015-05-26T01:15:38+5:30
राज्यात उष्णतेची लाट आलेली असताना आणि पारा दिवसेंदिवस नवे रेकॉड बनवत असताना पुण्यात मात्र तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र आहे.
पुणे : राज्यात उष्णतेची लाट आलेली असताना आणि पारा दिवसेंदिवस नवे रेकॉड बनवत असताना पुण्यात मात्र तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याचे चित्र आहे. ऐन मे महिन्यात आज चक्क पुण्याचे तापमान सरासरीच्या खाली गेले. त्यामुळे आज पुणेकरांना उकाडा जाणवत नसल्याचे चित्र होते.
आज शहरात कमाल तापमान ३५.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. ते सरसरीपेक्षा ०.८ अंशांनी घटले होते. गेल्या आठवडयापासून शहराचे कमाल तापमान ३६ अंशाच्या घरातच स्थिरावलेले आहे. विशेष म्हणजे, याच काळात राज्यात आलेली उष्णेची लाट अधिक तीव्र झाली होती. पण पुण्यात असलेल्या ढगाळ हवमानामुळे तापमान वाढीला प्रतिबंध होत होता. आजही शहरात ढगाळ हवामान होते. त्यामुळे तापमान वाढलेच नाही.
कमाल तापमान कमी असताना किमान तापमानात मात्र आज वाढ झाली आणि ते २४ अंशाच्या घरात पोहोचले.
मेघगर्जनेसह पावसाची शक्यता
४येत्या २७ मे ला पुण्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडेल आणि तापमानात वाढ होईल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तविला आहे.