नांदेडमध्ये लवकरच पंजाबी अकादमी
By admin | Published: July 1, 2017 02:50 AM2017-07-01T02:50:40+5:302017-07-01T02:50:40+5:30
महाराष्ट्रात विशेषत: नांदेड येथे पंजाबी समाज अधिक आहे, हे लक्षात घेऊन नांदेड येथे पंजाबी अकादमी सुरू करणार असल्याचे
विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रात विशेषत: नांदेड येथे पंजाबी समाज अधिक आहे, हे लक्षात घेऊन नांदेड येथे पंजाबी अकादमी सुरू करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी जाहीर केले.
वर्षा या मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी साहेब श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३५० व्या जयंतीनिमित्त प्रकाश पर्व हा विशेष कार्यक्रम झाला. त्यावेळी मुख्यमंत्री, त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, पद्मश्री विमल सिंग खालसा, आ. सरदार तारासिंग, अफताक शास्त्री आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, नांदेड येथे ऐतिहासिक कार्यक्रमाद्वारे प्रकाश पर्वचा सांगता समारंभ आयोजित केला जाईल. प्रकाशपर्व अंतर्गत विविध ठिकाणी होत असलेल्या कार्यक्रमांसाठी राज्य शासनामार्फत सर्व सहकार्य करण्यात येईल. गुरु गोविंदसिंग यांची परंपरा पुढे नेत समाजातील विषमता, दारिद्र्य दूर करण्यासाठी एकत्र येऊया, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी शीख धर्मीय मुंबई, ठाणे, नवी मुंबई, नांदेड, दिल्ली येथून वर्षा निवासस्थानी जमले होते.