रस्सीखेचमध्ये पंजाबचा ‘डबलबार’
By admin | Published: November 26, 2014 11:49 PM2014-11-26T23:49:54+5:302014-11-27T00:14:43+5:30
राष्ट्रीय स्पर्धा : हरियाणा, केरळचा पराभव
सांगली : तगड्या हरियाणा आणि केरळचा धुव्वा उडवत अनुभवी पंजाबने खुल्या विभागातील दोन्ही वजनीगटांचे विजेतेपद आपल्या नावे करत ‘डबलबार’ उडविला. महाराष्ट्रास उपांत्य फेरीतच पराभवाचा धक्का बसल्याने पिछाडीवर रहावे लागले.
जिल्हा रस्सीखेच असोसिएशनतर्फे छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये या स्पर्धा पार पडल्या. वेळ, ताकत, कौशल्य आणि दम, आदी चारही गोष्टींचा समतोल साधत अंतिम फेरीतील लढती पार पडल्या. ४८० किलोत पंजाब विरूद्ध हरियाणा असा अटीतटीचा मुकाबला झाला. पहिल्या फेरीत अग्रेसर असणाऱ्या हरियाणाला दुसऱ्या फेरीत पंजाबने खेचत नेवून विजय मिळविला.
५०० किलोत केरळ विरूद्ध पंजाब असा मुकाबला झाला. बलाढ्य पंजाबने केरळचे आव्हान पहिल्या फेरीतच संपवण्याचा प्रयत्न
केला. अनुभवी पंजाबने केरळचा पराभव करून विजय मिळविला. पारितोषिक वितरण आ. सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भारतीय रस्सीखेच महासंघाच्या सरचिटणीस माधवी पाटील होत्या. विजय कडणे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुहास व्हटकर यांनी आभार मानले.
यावेळी माजी उपमहापौर शेखर इनामदार, युवराज बावडेकर, आशा शिंदे, मदन मोहन, जे़ ए़ गुपीले, राष्ट्रीय प्रशिक्षक राजेंद्र कदम, सागर फडके, गणेश गवळी, ओंकार पाटणकर, विलास गायकवाड, आदी उपस्थित होते. (क्रीडा प्रतिनिधी)