पुण्यात विनयभंग, पत्ता विचारण्याच्या बहाण्याने मुलीला दाखवली पॉर्नक्लिप
By admin | Published: February 27, 2017 12:49 PM2017-02-27T12:49:00+5:302017-02-27T12:51:25+5:30
पुणे शहर दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित बनत चालले आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढत आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 - पुणे शहर दिवसेंदिवस महिलांसाठी असुरक्षित बनत चालले आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांची संख्या वाढत आहे. नुकतीच पुण्यात पत्ता विचारण्याच्या बहाण्याने एका अल्पवयीन मुलीला पॉर्न क्लिप दाखवण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 15 फेब्रुवारील संध्याकळी साडेपाचच्या सुमारास घडली.
स्मार्ट सिटी प्रकल्पासाठी पुण्यात जो भाग मॉडेल म्हणून विकसित करण्यात येणार आहे त्या बानेर-पाशाण लिंकरोडवर ही घटना घडली. पीडित मुलगी खासगी शिकवणी क्लासला चालली असताना ओजस सोसायटीजवळ एक वॅगनर कार तिच्याजवळ येऊन थांबली. गाडीमधल्या माणसाने तिला पाशाणचा पत्ता विचारला.
मुलीने मार्गदर्शन केल्यानंतर त्याने पत्ता सविस्तरपणे समजून घेण्याच्या बहाण्याने खिशातून मोबाईल काढला व मुलीला पॉर्नक्लिप दाखवली. या प्रकाराने भांबावलेल्या त्या मुलीने तिथून पळ काढला. दहादिवस ती कोणाशी काही बोलली नाही. तिची अस्वस्थतात ओळखून जेव्हा वडिलांनी तिला विचारले तेव्हा तिने घडला प्रकार सांगितला. वडिलांनी लगेचच पोलिस स्टेशन गाठून गुन्हा नोंदवला. मुलीने केलेले वर्णन आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.