पुणो-शिरूर रस्ता होणार टोलमुक्त

By admin | Published: August 7, 2014 11:14 PM2014-08-07T23:14:59+5:302014-08-07T23:14:59+5:30

उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार आज रात्री बारापासून शिरूर-पुणो रस्त्यावरील पेरणो टोलनाका बंद करावा लागणार आह़े प्रमोद मोहोळे यांच्या जनहित याचिकेवर 28 एप्रिलला उच्च न्यायालयाने सदर आदेश दिले होत़े

Puno-Shirur road will be toll free | पुणो-शिरूर रस्ता होणार टोलमुक्त

पुणो-शिरूर रस्ता होणार टोलमुक्त

Next
>शिरूर :  उच्च न्यायालयाच्या आदेशनुसार आज रात्री बारापासून शिरूर-पुणो रस्त्यावरील पेरणो टोलनाका बंद करावा लागणार आह़े प्रमोद मोहोळे यांच्या जनहित याचिकेवर 28 एप्रिलला उच्च न्यायालयाने सदर आदेश दिले होत़े 
प्रमोद मोहोळे यांनी 2क्क्8 साली शिरूर-पुणो टोलविरोधात जनहित याचिका दाखल केली होती़ मोहोळे यांनी 2क्क्8 सालीच या टोलची मुदत संपल्याचा दावा याचिकेत केला होता़ यावर न्यायालयाने शासनाला आपले म्हणणो मांडण्यास सांगितले होत़े शासनाने यासंदर्भात अभ्यास समिती नेमली होती़ या समितीने या टोलची मुदत 7 ऑगस्ट 2क्14 ला संपत असल्याचा अहवाल दिला होता़ यानुसार उच्च न्यायालयाने 28 एप्रिलला या टोलबंदचे आदेश दिले होत़े या आदेशानुसार आज (दि.7) रात्री 12 ला या टोलची मुदत संपत असून, उद्यापासून शिरूर-पुणो रस्ता टोलमुक्त होणार आह़े
अभ्यास समितीने 7 ऑगस्टला मुदत संपल्याचे म्हटले असले, तरी मोहोळे यांच्या म्हणण्यानुसार 2क्13-14 मध्ये शासनाने नूतनीकरणासाठी 16 कोटी रुपये खर्च झाल्याचे दाखविले आह़े प्रत्यक्षात हा खर्च केलेलाच नसल्याने ही रक्कम वजावट करता टोलची मुदत एप्रिललाच संपली आह़े
तरीदेखील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 7 ऑगस्टला का होईना हा टोल बंद होतोय याचा आनंद असल्याचे  मोहोळे यांनी सांगितल़े
मोहोळे म्हणाले, की सुरुवातीपासून या रस्त्यावरील टोलप्रकरण वादग्रस्त राहिल़े न्यायालयीन लढा देताना या रस्त्यावरील प्रत्येक उणिवा निदर्शनास आणल्याचा प्रयत्न केला़ झाडांचा प्रश्न असो, कोरेगाव-भीमाच्या पुलाच्या उंचीचा प्रश्न असो, दुभाजकाचा, तसेच त्यावरील लाईटकरणाचा प्रश्न असो, याबरोबर अनेक प्रश्न निदर्शनास आणल़े अखेर लढाई जिंकली़ (वार्ताहर)
 
मुदतवाढ देण्यास न्यायालयाचा नकार 
टोलउद्योजकाने उच्च न्यायालयात 1क् दिवसाची टोलमुद्दतवाढ मागितली होती. याबाबत आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने मुदतवाढ देण्यास नकार दिला. यामुळे आज रात्री 12 पासून शिरूर - पुणो रस्ता टोलमुक्त होणार आहे. या टोलनाक्यासंदर्भात अनेक आंदोलने झाली. क्रांतीवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय पाचंगे हे देखील 2क्1क् पासून या प्रश्नी लढा देत होते. अखेर न्यायालयीन लढय़ात यश प्राप्त होवून शिरूर - पुणो रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला.

Web Title: Puno-Shirur road will be toll free

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.