'मंदिर जिर्णोद्धारासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी', पडळकरांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2023 08:46 PM2023-08-03T20:46:01+5:302023-08-03T20:47:28+5:30

Gopichand Padalkar : राज्यातील शिव मंदिरांसह हेमाडपंथी वास्तुरचना असलेल्या अनेक प्राचिन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याची गरज आहे. यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी, अशी मागणी गोपिचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे.

'Punyashlok Ahilya Devi Holkar Temple Restoration Survey Committee' should be formed for temple restoration, demand of Padalkars | 'मंदिर जिर्णोद्धारासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी', पडळकरांची मागणी

'मंदिर जिर्णोद्धारासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी', पडळकरांची मागणी

googlenewsNext

मुंबई - राज्यातील अनेक प्राचिन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याची गरज आहे. यासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी, अशी मागणी गोपिचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केली आहे. 

 देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात गोपिचंद पडळकर यांनी म्हटले आहे की, भारताच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातील दिपस्तंभ म्हणून महाराष्ट्राकडे पाहिले जाते. अधुनिकतेची शिखरं महाराष्ट्र मोठ्या दिमाखाने मिरवतोय. हा सर्व डोलारा उभा आहे तो महाराष्ट्राच्या प्राचिन संपन्नतेवर. या इतिहासाची साक्षं देणारी हजारो वर्षांपुर्वीची मंदिरं आजही उभी आहेत. आपल्या भव्य दिव्य संस्कृती परंपरेची साक्ष देत आहेत. या मंदिरांकडे पाहिलं तरी नव्या काळात उर्जा मिळते.

सध्या पवित्र श्रावण महिना सुरु आहे. त्या निमित्तानं राज्यभरातील शिवमंदिरांना भेटी देण्यासाठी भाविक लाखोंची गर्दी करतायेत. शिव मंदिरांसह हेमाडपंथी वास्तुरचना असलेल्या अनेक प्राचिन मंदिरांचा जिर्णोद्धार करण्याची गरज समोर येते आहे. यासाठी डेक्कन महाविद्यालय, तसेच पुरातत्त्व विभागाची मदत घेता येईल. मंदिर जिर्णोद्धारासाठी 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मंदिर जिर्णोद्धार सर्वेक्षण समिती' गठीत करावी. या समितीच्या माध्यमातून राज्यभरातील सर्व प्राचिन मंदिराचे सर्वेक्षण करता येईल. राज्यशासना पुढे समितीने अहवाल सादर केल्यानंतर जिर्णोद्धाराच्या दिशेने योग्य पावलं टाकता येतील.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी संपुर्ण आयुष्य मंदिर जिर्णोद्धार कार्यात वाहिलं. मंदिरांसोबत त्या नवं भारताची निर्मिती ही करत होत्या. देशाच्या सीमानिश्चिती करत होत्या. जिर्णोधार कार्यातून स्थानिक स्तरांवर त्यामार्गे मोठे उद्योग निर्माण झाले. बाजारपेठा तयार झाल्या. त्यातून तत्कालीन अर्थव्यवस्थेला चालना मिळाली. अहिल्यादेवींची दुरदृष्टी आम्हाला आपणात दिसते. त्यामुळे आपल्या हातून हे जिर्णोद्धार कार्य नक्की पुर्ण होईल अशी आम्हाला खात्री आहे, असे पडळकर यांनी या पत्रात म्हटले आहे. 
 

Web Title: 'Punyashlok Ahilya Devi Holkar Temple Restoration Survey Committee' should be formed for temple restoration, demand of Padalkars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.