शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या गळ्यात घातला चपलांचा हार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2015 12:16 PM2015-10-21T12:16:58+5:302015-10-21T12:32:03+5:30
वर्गात चप्पल घालून आले म्हणून शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या गळ्यात चक्क चपलांचा हार घातल्याचा संतापनजक प्रकार कळंब तालुक्यातील घडला आहे.
ऑनलाइन लोकमत
उस्मानाबाद, दि. २१ - वर्गात चप्पल घालून आले म्हणून संतापलेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या गळ्यात चक्क चपलांचा हार घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. उस्मानाबादमधील शाळेत सोमवारी हा प्रकार घडला असून यामुळे गावातील वातावरण तापले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उस्मानाबाद जिल्ह्यातील अंदोरा जिल्हा परिषदेच्या शाळेत वर्गात शिकताना चपला बाहेर काढण्याचा नियम आहे. मात्र सातवीत शिकणारे काही विद्यार्थी हा नियम विसरले आणि ते वर्गात चपला घालून गेले. यामुळे त्यांची शिक्षिका संतापली आणि तिने मुलांना वर्गाबाहेर जाऊन सर्व चपला गोळा करून आणण्यास सांगितले. त्यानंतर तिने चपलांचा हार करून सात विद्यार्थ्यांच्या गळ्यात घातला. या प्रकाराची कुठेही वाच्यता तुमचे फोटो काढून गावभर लावेन अशी या शिक्षिकेने विद्यार्थ्यांना दिली.
दरम्यान संबंधित शिक्षिकेची गटशिक्षणअधिका-यांकडे तक्रार करण्यात आली असून त्या शिक्षिकेची चौकशी सुरू आहे, मात्र तिच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.