पुरंदरे, डोंगरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

By Admin | Published: August 24, 2014 01:42 AM2014-08-24T01:42:10+5:302014-08-24T01:42:10+5:30

साहित्य अकादमीच्या वतीने 21 भाषांमधील लेखनासाठी देण्यात येणा:या वार्षिक युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा झाली

Purandare, Dongre received Sahitya Akademi Award | पुरंदरे, डोंगरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

पुरंदरे, डोंगरे यांना साहित्य अकादमी पुरस्कार

googlenewsNext
मुंबई : साहित्य अकादमीच्या वतीने 21 भाषांमधील लेखनासाठी देण्यात येणा:या वार्षिक युवा आणि बाल साहित्य पुरस्कारांची घोषणा झाली असून, युवा लेखक अवधूत डोंगरे यांनी या पुरस्कारावर मराठीची मोहोर उमटवली आहे. तर बाल साहित्याच्या क्षेत्रत दिलेल्या भरीव योगदानासाठी माधुरी पुरंदरे यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
‘स्वत:ला फालतू समजण्याची गोष्ट’ या कादंबरीसाठी अवधूत डोंगरे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी याच कादंबरीसाठी राज्य शासनाच्या वतीने युवा लेखकांच्या प्रथम कलाकृतीसाठी देण्यात येणारा श्री. म. माटे पुरस्कार मिळाला आहे. साहित्य अकादमीच्या वतीने 13 कवितासंग्रह, चार कथा संग्रह तसेच तीन कादंब:या आणि एका निबंध संग्रहाला पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. 
आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका व चित्रकार माधुरी पुरंदरे यांनी मुंबईतील जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून जीडी आर्ट केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्ट यांचं शिक्षण घेतले. 
साहित्य, कला व चित्रकला क्षेत्रत त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यांनी लिहिलेले आमची शाळा, कंटाळा, काकूचं बाळ, किकीनाक, कोकरू, खजिना (ऊर्जा), जादूगार आणि इतर कथा, टंगळमंगळ आणि इतर कथा, त्या एका दिवशी, पाहुणी, बाबाच्या मिशा, मामाच्या गावाला, मासोळी आणि चिमुकलं पाखरू, मुखवटे, मोठी शाळा, राजा शहाणा झाला, राधाचं घर (6 पुस्तकांचा संच), लालू बोक्याच्या 
गोष्टी, शाम्याची गंमत आणि इतर कथा, सुपर बाबा आणि इतर कथा, हात मोडला असे विविधरंगी बाल साहित्य प्रसिद्ध आहे. त्यांना याच योगदानासाठी बाल साहित्य क्षेत्रतील पुरस्कार जाहीर झाला आहे. (प्रतिनिधी)
 
माधुरी पुरंदरे या आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या लेखिका व चित्रकार आहेत. त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्समधून जीडी आर्ट केल्यानंतर पॅरिस येथे जाऊन चित्रकला व ग्राफिक आर्ट यांचं शिक्षण घेतले. तर अवधूत डोंगरे यांना यापूर्वी राज्य शासनाचा श्री. म. माटे पुरस्कार मिळाला आहे.
 
14 नोव्हेंबरला बंगळुरूमध्ये होणार वितरण
1साहित्य अकादमीच्या वतीने यंदा एकूण 21 भाषांमधील विविध साहित्यिकांना त्यांच्या कलाकृतींसाठी युवा पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत, तर बाल साहित्य क्षेत्रसाठी 23 भाषांमधील साहित्यिकांच्या वा्मयीन कृतींना गौरविण्यात आले आहे.
 
2यंदा साहित्य अकादमीच्या वतीने संस्कृत भाषेकरिता बाल साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले नाहीत, तर युवा साहित्य क्षेत्रतही डोंगरी आणि काश्मिरी भाषेसाठी यंदा पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली नाही. सिंधी भाषेतील युवा पुरस्कारांची घोषणा काही कालावधीनंतर करण्यात येईल, असे साहित्य अकादमीच्या वतीने कळविण्यात आले आहे.
 
3बाल साहित्य पुरस्कारांचे वितरण 14 नोव्हेंबर रोजी बंगळुरू येथील एका विशेष कार्यक्रमात करण्यात येईल. या बाल साहित्य पुरस्कारांचे स्वरूप ताम्रफलक, शाल आणि 5क् हजार रुपये रोख रक्कम असे आहे; तर युवा पुरस्काराचे स्वरूप 5क् हजार रुपये आणि ताम्रफलक असे आहे.

 

Web Title: Purandare, Dongre received Sahitya Akademi Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.