शुद्ध पाण्याचे एटीएम मशीन; चंद्रपूर जिल्ह्यातील लोणवाही ग्रामपंचायतीचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 02:40 PM2018-08-10T14:40:56+5:302018-08-10T15:01:39+5:30

जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या लोणवाही या गावात शुक्रवारी सकाळी शुद्ध पाण्याच्या एटीएमचे उदघाटन करण्यात आले.

Pure water ATM machine; Lonavahi Gram Panchayat undertaking in Chandrapur district | शुद्ध पाण्याचे एटीएम मशीन; चंद्रपूर जिल्ह्यातील लोणवाही ग्रामपंचायतीचा उपक्रम

शुद्ध पाण्याचे एटीएम मशीन; चंद्रपूर जिल्ह्यातील लोणवाही ग्रामपंचायतीचा उपक्रम

googlenewsNext
ठळक मुद्देपाच रुपयात २० लीटर पाणीपाण्यासाठी गावकऱ्यांना दिले एटीएम कार्ड


राकेश बोरकुलवार
लोकमत न्यूज नेटवर्क
चंद्रपूर- जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यात असलेल्या लोणवाही या गावात शुक्रवारी सकाळी शुद्ध पाण्याच्या एटीएमचे उदघाटन करण्यात आले. या गावात गढूळ व पिण्यास अयोग्य पाणी येत होते. त्यामुळे गावकऱ्यांना आरोग्याच्या समस्याही भेडसावत होत्या. या सर्व बाबींचा विचार करून येथील ग्रामपंचायतीने हे स्तुत्य पाऊल उचलले आहे. येथील सरपंच गणेश गोलपल्लीवार व ग्रामसेविका मीनाक्षी बन्सोड यांच्या पुढाकारातून हे पाण्याचे एटीएम साकार झाले आहे.
या ठिकाणी गावकऱ्यांना अवघ्या ५ रुपयात २० लीटर पाणी मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी सर्व गावकऱ्यां

ना एक एटीएम कार्डही दिले आहे. या कार्डाचा वापर करून पाणी वाटप केले जाणार आहे.

Web Title: Pure water ATM machine; Lonavahi Gram Panchayat undertaking in Chandrapur district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी