‘उजनी’तील पळसनाथ मंदिर उघडे

By Admin | Published: April 27, 2016 02:12 AM2016-04-27T02:12:02+5:302016-04-27T02:12:02+5:30

पळसनाथाचे अतिप्राचीन हेमाडपंती मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने पूर्णपणे उघडे पडले आहे.

Pushasnath temple in 'Ujani' is open | ‘उजनी’तील पळसनाथ मंदिर उघडे

‘उजनी’तील पळसनाथ मंदिर उघडे

googlenewsNext

इंदापूर : पुणे-सोलापूर महामार्गावर इंदापूरपासून सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या पळसदेव येथील भीमा नदीच्या पात्रात सन १९७५मध्ये जलसमाधी मिळालेले पळसनाथाचे अतिप्राचीन हेमाडपंती मंदिर उजनी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याने पूर्णपणे उघडे पडले आहे.
या मंदिराचा काळ जरी निश्चित नसला, तरी त्याचे वर्णन ज्ञानेश्वरीच्या १८व्या अध्यायात ‘पलाशतीर्थ’ म्हणून आढळून येते. पळसनाथाच्या या हेमाडपंती मंदिराचे संपूर्ण कोरीव काम दगडात करण्यात आले आहे.
शिखराची बांधणी सप्तभूमी पद्धतीची आहे. त्यासाठी पक्क्या विटा, चुना इत्यादींचा वापर करण्यात आला आहे. मंदिरासमोर भव्य सभामंडप, गाभारा आहे. उंच शिखर, लांब-लांब शिळा आहेत. विविध मदनिका, अलासकन्या, सुरसुंदरी, जलमोहिनी, नागकन्या अशी नावे देण्यात आली आहेत. ज्या वेळी एखादा भक्त मंदिरात प्रवेश करतो, त्या वेळी त्याने आपल्या मनातील वाईट भावना मंदिराबाहेरच सोडून निर्मळ मनाने मंदिरात प्रवेश करावा, या उद्देशाने ही महिलारूपी शिल्पे मंदिराच्या शिखरावर कोरलेली आहेत, असे इतिहासकार सांगतात.
मूर्ती चौकोनी खांब, वतुर्ळाकार पात्रे, त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंचशाखा सुस्थितीत दिसून येतात. शिल्प मूर्तींमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर-पार्वती, तीन वीरगळी, रामायण-महाभारतकालीन कलाकृती, इंद्राच्या दरबारात असणाऱ्या देवीदेवतांची शिल्पे, त्या काळातील अप्रतिम कोरीव काम, जडणघडण पाहणाऱ्याच्या डोळ्यांचे पारणे फेडते.
मंदिराच्या आवारात गेले असता गाभाऱ्याच्या समोर असलेला नंदी भाविकांचे लक्ष वेधून घेतो. मंदिराची पूर्ण रचना केवळ २७ दगडी नक्षीदार खांबांपासून तयार केलेली आहे. शिखर भागाकडे प्रवेश करण्यासाठी छोटेसे दार आहे.
शिखर भागात सतत सूर्यप्रकाश खेळता राहावा, याकरिता चारही बाजूंनी मोठमोठे सौने (मोठी छिद्रे) आहेत. मंदिराच्या आवारात प्रामुख्याने वड, पिंपळ, चिंच या तीन झाडांची खोडे फांद्यांसह आजही योद्ध्याच्या आविभार्वात कणखरपणे उभी दिसतात.
मंदिराच्या सभोवताली भव्य दगडी तटबंदी आहे. तिची बरीचशी पडझड झाली आहे; मात्र दिमाखदार आस्तित्व आजही कायम आहे.

Web Title: Pushasnath temple in 'Ujani' is open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.