विदर्भासाठी दिल्लीवर दबाव आणा - श्रीहरी अणे

By admin | Published: January 24, 2016 12:25 AM2016-01-24T00:25:03+5:302016-01-24T00:25:03+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे महाराष्ट्रातून तरी शक्य नाही. महाराष्ट्र सरकार राज्य निर्माण करू शकत नाही; तिथे फक्त ठराव होतो. विदर्भातील आमदारांची संख्या लक्षात घेतली तर हा ठराव

Put pressure on Delhi for Vidarbha - Shreehi Ane | विदर्भासाठी दिल्लीवर दबाव आणा - श्रीहरी अणे

विदर्भासाठी दिल्लीवर दबाव आणा - श्रीहरी अणे

Next

चंद्रपूर : स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती होणे महाराष्ट्रातून तरी शक्य नाही. महाराष्ट्र सरकार राज्य निर्माण करू शकत नाही; तिथे फक्त ठराव होतो. विदर्भातील आमदारांची संख्या लक्षात घेतली तर हा ठराव मुंबईत पास होणे शक्य नाही. त्यामुळे दिल्लीवर दबाव आणा, तो कसा आणायचा यासाठी विचार करा, असे सांगत राज्याचे महाअधिवक्ता अ‍ॅड. श्रीहरी अणे यांनी विदर्भ राज्यासाठी लढ्याचे संकेत दिले.
स्थानिक जनता महाविद्यालयात शनिवारी सायंकाळी झाल्या ‘विदर्भ गाथा’ या समारंभात त्यांनी दिल्लीवर दबाव आणण्याचे आवाहन केले. अ‍ॅड. अणे म्हणाले, तेलंगणच्या निर्मितसाठी १२०० तरुणांनी बलिदान दिले. विदर्भासाठी असे रक्त सांडविण्याची दिल्लीकर वाट बघत असतील तर ते अयोग्य आहे. आम्ही वीज निर्माण करतो, कोळसा त्यांना देतो, तिकडच्या प्रकल्पासाठी आमचे जंगल देतो. विदर्भातील शेतकऱ्यांनी ठरविले तर महाराष्ट्रावर उपाशी राहायची पाळी येईल.
विदर्भाच्या भावनांचा भडका उडाला तर त्याची किंमत कुणालाही भरून देता येणार नाही. आपणच आपली जाळपोळ करायची, आपल्याच माणसांच्या तोंडाला काळे फासायचे, आपल्याच माणसांना अपमानीत करायचे, हा मार्ग नव्हे. मात्र उद्याच्या भविष्यात हेच होणार, हे आपणाला आतापासून दिसत आहे, असे ते म्हणाले. माजी केंद्रीय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साहित्य संमेलनादरम्यान केलेल्या वक्तव्याबद्दल अणे म्हणाले, साहित्यिकांना महाराष्ट्राएवढाच विदर्भ प्रिय आहे. विदर्भातील साहित्यिकांनी विदर्भाबद्दल का बोलू नये? विदर्भातील मराठीपण, हिंदीपण समजून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

Web Title: Put pressure on Delhi for Vidarbha - Shreehi Ane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.