‘समृद्धी’वर सूचना फलक लावा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2023 07:41 AM2023-11-26T07:41:09+5:302023-11-26T07:42:10+5:30
Samruddhi Mahamarg: मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सूचना फलक लावावेत, अशी मागणी आरटीओने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) केली आहे.
मुंबई : मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गावर सूचना फलक लावावेत, अशी मागणी आरटीओने महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे (एमएसआरडीसी) केली आहे.
राज्यात गेल्यावर्षी ३३,३८३ अपघात झाले. यामध्ये १५,२२४ जणांचा बळी गेला तर २७,२३९ जण जखमी झाले. काही समृद्धी मार्गावरही जास्त अपघात होत आहेत. वाहन चालकांना अपघात टाळण्यासाठी सूचना फलक मदत करतो. पण समृद्धी महामार्गावर सूचना फलक नसल्याने अनेक अपघात झाले असून, १२० हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
समृद्धी महामार्गावर सर्व रस्ते नियमांचे पालन करण्यात आले आहे. आरटीओ अधिकाऱ्यांच्या मागणीनुसार सूचना फलक लावले आहेत. परंतु, काही कामे अपूर्ण असतील ती कामे सर्व यंत्रणा संयुक्त भेट देऊन पूर्ण करतील, असा निर्णय संयुक्त बैठकीत घेण्यात आला आहे.
- संजय यादव,
सहसंचालक, एमएसआरडीसी