वैचारिक मतभेद बाजूला ठेवू; आता आपल्या बळीराजासाठी एकत्र येऊ: प्रकाश आंबेडकरांना शेट्टींची साद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2020 06:26 PM2020-12-16T18:26:41+5:302020-12-16T18:27:49+5:30

वैचारिक मतभेद असतील ते बाजूला सारून त्यांनी मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हावे...

Putting aside your ideological differences, for farmer: Raju Shetty's call to Prakash Ambedkar | वैचारिक मतभेद बाजूला ठेवू; आता आपल्या बळीराजासाठी एकत्र येऊ: प्रकाश आंबेडकरांना शेट्टींची साद

वैचारिक मतभेद बाजूला ठेवू; आता आपल्या बळीराजासाठी एकत्र येऊ: प्रकाश आंबेडकरांना शेट्टींची साद

Next

पुणे : केंद्राने मंजूर केलेले कृषी विधेयक रद्द व्हावेत, यासाठी सर्व शेतकरी संघटना एकत्रित लढत आहेत. त्याचवेळी भाजपाच्या शेतकरी संघटना देखील त्यांच्या कृषी कायद्याच्या बाजूने बोलताना दिसत नाही. तरीही पंतप्रधान मोदी का अडून बसले आहेत. परंतू जोपर्यंत सरकार मागे हटणार नाही तोपर्यंत शेतकरी मागे हटणार नाहीत. तसेच ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासारख्या बड्या उद्योजकांसाठी हे विधेयके मंजूर करण्यात आली आहे. त्याच्या निषेध म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व शेतकरी बांधवाना सोबत घेऊन २२ डिसेंबरला मुंबईत उपजिल्हाधिकारी कार्यालय ते अंबानी इस्टेटवर धडक मोर्चा काढणार आहेत. या धडक मोर्चात प्रकाश आंबेडकर तुम्ही देखील सहभागी व्हावे अशी साद माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. 

पुण्यात बुधवारी (दि. १६) झालेल्या पत्रकार परिषदेत राजू शेट्टी बोलत होते. यावेळी ज्येष्ठ  कामगार नेते डॉ. बाबा आढावा, सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, प्रतिभा शिंदे, राजू पोकळे, अमोल हिप्परगे आदी उपस्थित होते. 

राजू शेट्टी म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांनी देखील शेतकर्‍यांच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. तसेच ते सुद्धा शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आंदोलन करणार आहेत. मात्र, आमच्यात जे काही वैचारिक मतभेद असतील ते बाजूला सारून त्यांनी मुंबईच्या मोर्चात सहभागी व्हावे, आम्ही त्यांचे स्वागतच करू. कारण बळीराजासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे.  

केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना शेट्टी म्हणाले, गेल्या २० दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. कोरोना काळात शेती व्यवसाय कंपन्यांना समजला आहे. त्यामुळेच अदानी, अंबानी यांना हा व्यवसाय देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. 

ज्या अंबानी आणि अदानी यांच्यासाठी केंद्र सरकारने हे कृषी विधेयक आणले आहे. त्यांच्यातील अंबानी यांची तर जगातल्या पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत नाव घेतलॆ जाते. आम्हाला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे, बाबा नेमकी तुझी भूक भागणार तरी कधी आहे ? हा प्रश्न आम्ही सर्वजण मुंबईतील मोर्चात मुकेश अंबानी यांना विचारणार आहोत. 

Web Title: Putting aside your ideological differences, for farmer: Raju Shetty's call to Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.