पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कार जाहीर

By Admin | Published: December 13, 2015 02:24 AM2015-12-13T02:24:33+5:302015-12-13T02:24:33+5:30

लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत.

P.V. Gadgil, Baba Dalvi Memorial Award | पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कार जाहीर

पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कार जाहीर

googlenewsNext

नागपूर : लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित पां.वा. गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. हे पुरस्कार नागपूर येथे १६ डिसेंबरला समारंभपूर्वक प्रदान केले जातील.
या दोन्ही प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे २०१२ ते १५ या चार वर्षांचे मानकरी जाहीर करण्यात आले आहेत. पुरस्कार वितरण सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहतील. या कार्यक्रमात आजची पत्रकारिता व शासन या विषयावर कौन्सिल फॉर इंडियन फॉरेन पॉलिसीचे अध्यक्ष डॉ. वेदप्रकाश वैदिक यांचे व्याख्यान आयोजले आहे. लोकमत एडिटोरियल बोर्ड व लोकमत मीडिया प्रा. लि. चेअरमन विजय दर्डा यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी शालेय शिक्षणमंत्री व लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा असतील. पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे- पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा- वर्ष २०१२- प्रथम- अ‍ॅड.कांतीलाल तातेड, नाशिक, वर्ष २०१३- प्रथम-ज.शं. आपटे, पुणे, द्वितीय. वर्ष २०१४- प्रथम - डॉ. नितीन चौधरी, अकोला, द्वितीय-सुनील चव्हाण, पुणे, तृतीय - डॉ. क्रांतिकुमार शर्मा, नांदेड; वर्ष- २०१५- प्रथम - डॉ. जे.एफ.पाटील, कोल्हापूर, द्वितीय - डॉ. वर्षा गंगणे, गोंदिया, तृतीय - बापू अडकिने, परभणी. बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा- वर्ष २०१२- प्रथम - हरी विश्वनाथ मोकाशे, लातूर, द्वितीय - सविता देव हरकरे, नागपूर व तृतीय- भालचंद्र कुलकर्णी, अहमदनगर; वर्ष २०१३- प्रथम- संजय देशपांडे, औरंगाबाद, द्वितीय- दिनेश गुप्ता, औरंगाबाद व तृतीय- नरेश डोंगरे, नागपूर; वर्ष २०१४- प्रथम-गणेश देशमुख, अमरावती, द्वितीय- विठ्ठल हेंद्रे, सातारा व तृतीय- संदीप रायपुरे, चंद्रपूर ; वर्ष २०१५- प्रथम- प्रदीप तरकसे, अंबाजोगाई, बीड, द्वितीय- ज्ञानेश्वर भाले, जळगाव व तृतीय- शिवाजी भोसले, सोलापूर.
पुरस्कारांचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. परीक्षक म्हणून लोकमतचे समन्वयक संपादक कमलाकर धारप, ज्येष्ठ संपादक ल. त्र्यं. जोशी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. श्रीनिवास खांदेवाले व लोकमत टाइम्स नागपूरचे वाणिज्य संपादक सोपान पांढरीपांडे यांनी काम पाहिले.

Web Title: P.V. Gadgil, Baba Dalvi Memorial Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.