पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कार २०१५-१६ जाहीर

By admin | Published: January 4, 2017 02:59 AM2017-01-04T02:59:38+5:302017-01-04T02:59:38+5:30

लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे द्वितीय संपादक

P.V. Gadgil, Baba Dalvi Memorial Award 2015-16 | पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कार २०१५-१६ जाहीर

पां.वा. गाडगीळ, बाबा दळवी स्मृती पुरस्कार २०१५-१६ जाहीर

Next

नागपूर : लोकमततर्फे घेतल्या जाणाऱ्या पत्रपंडित व लोकमतचे प्रथम संपादक पां.वा.गाडगीळ स्मृती आर्थिक-विकासात्मक लेखन आणि पत्रमहर्षी व लोकमतचे द्वितीय संपादक म.य. उपाख्य बाबा दळवी स्मृती शोधपत्रकारिता स्पर्धा २०१५-१६ चे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे-पां.वा. गाडगीळ आर्थिक-विकासात्मक लेखन स्पर्धा- वर्ष २०१५- १६: प्रथम-अ‍ॅड.कांतीलाल तातेड, नाशिक, (बचत योजनांशी दगाफटका, लोकसत्ता); द्वितीय-मेघना ढोके, नाशिक, (तारकाटा बेडा, लोकमत); तृतीय- सुधीर द. फडके, पुणे, (शेती सिंचन हाच नियोजनाचा केंद्रबिंदू ठरावा, महाराष्ट्र सिंचन विकास). बाबा दळवी शोधपत्रकारिता स्पर्धा- वर्ष २०१५-१६: प्रथम-सचिन राऊत, अकोला (किडनी रॅकेटचा छडा, लोकमत); द्वितीय- संजय देशपांडे, औरंगाबाद, (दुष्काळात धुतले हात, लोकमत); तृतीय- सचिन वाघमारे, पुणे (उस्मानाबाद:१५५ पाणी पुरवठा योजना रखडल्या, महाराष्ट्र टाईम्स)
या पुरस्कार स्पर्धेतील आर्थिक-विकासात्मक लेखन गटाकरिता आलेल्या प्रवेशिकांमधून ३५ प्रवेशिका स्पर्धेकरिता पात्र ठरल्या. शोधपत्रकारिता गटाकरिता आलेल्या प्रवेशिकांमधून ३१ प्रवेशिका पात्र ठरल्या. दोन्ही गटांच्या पात्र प्रवेशिकांमधून तीन-तीन विजेत्यांची निवड करण्यात आली.
पुरस्कारांचे स्वरुप, रोख रक्कम, स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र असे आहे. या स्पर्धांचे परीक्षक म्हणून ज्येष्ठ संपादकद्वय रमेश फडनाईक व विनोद देशमुख यांनी काम पाहिले. पुरस्कार वितरणाच्या कार्यक्रमाचे आयोजन लवकरच केले जाणार आहे.

Web Title: P.V. Gadgil, Baba Dalvi Memorial Award 2015-16

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.