प्रा. विशाल यांना राष्ट्रीय पुरस्कार
By admin | Published: May 9, 2017 02:34 AM2017-05-09T02:34:35+5:302017-05-09T02:34:35+5:30
आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विज्ञान विभागामधील सहायक प्राध्यापक विक्रम विशाल यांना, भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयआयटी मुंबईच्या पृथ्वी विज्ञान विभागामधील सहायक प्राध्यापक विक्रम विशाल यांना, भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेतर्फे (आयएनएसए) देण्यात येणारा प्रतिष्ठेचा तरुण वैज्ञानिक पुरस्कार जाहीर झाला आहे.
तरुण वैज्ञानिकांमधील सर्जनशीलता आणि उत्कृष्ठतेचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. भारतातील वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनासाठी आयएनएसए ही संस्था दरवर्षी हा पुरस्कार देते. कांस्य पदक आणि २५ हजार रुपये रोख असे हे पुरस्काराचे स्वरूप आहे. प्राध्यापक विशाल सध्या कार्बन डायआॅक्साइडचे उत्सर्जन कमी करणे आणि नैसर्गिक वायूंच्या माध्यमातून पर्यावरणावरील त्याचा प्रभाव या विषयावर काम करीत आहेत.
२०१५ पर्यंत भारतीय राष्ट्रीय विज्ञान संस्थेने ७३७ तरुण वैज्ञानिकांचा सन्मान केला आहे. या पुरस्काराच्या नियुक्तीविषयी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अजय के. सूद यांनी सांगितले की, प्रा. विक्रम विशाल यांच्या संशोधन कार्यात कमालीची जिद्द आहे. त्यामुळे भविष्यातही ही जिद्द अशीच राहावी, जेणेकरून संशोधन क्षेत्राला नवे आयाम प्राप्त व्हावे.
तर प्रा. विक्रम विशाल यांनी या पुरस्काराविषयी आनंद व्यक्त करताना सांगितले की, या संशोधन कार्यात आयआयटी मुंबईचे प्रा. टी.एन. सिंग, मोनाश विद्यापीठाचे प्रा.रणजीत पी. जी. आणि स्टँडफोर्ड विद्यापीठाचे प्रा. जेनिफर विल्कॉस यांचे मार्गदर्शन अत्यंत मोलाचे होते. हा सन्मान मिळाल्यानंतर आपल्यावरील जबाबदारी अधिकच वाढल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
मिथेनचा वापर करणे शक्य-
प्रा. विक्रम विशाल यांनी आपल्या संशोधनाविषयी बोलताना सांगितले की, आपल्याकडे वर्षानुवर्षे नैसर्गिक वायू खडकांच्या संरचनेत अस्तित्वात आहे,
तसेच भारताची विशाल भौगोलिक विविधता लक्षात घेऊन, ती कार्बन डायॉक्साइडच्या साठवणीसाठी भरपूर
संधी देते. कार्बन डायआॅक्साइडच्या इंजेक्शनमुळे केवळ दीर्घ शाश्वत पृथ्वीचा विकास करण्यात मदत होणार नाही, तर वाढत्या ऊर्जेच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी मिथेनचाही वापर करता येईल.