कवाडेंना रोखले; आठवलेही थांबले!

By admin | Published: July 24, 2016 03:12 AM2016-07-24T03:12:43+5:302016-07-24T03:12:43+5:30

कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी मुंबईतून निघालेल्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंना त्यांचा नियोजित दौरा अचानक रद्द करावा लागला

Quadrena stops; I stopped! | कवाडेंना रोखले; आठवलेही थांबले!

कवाडेंना रोखले; आठवलेही थांबले!

Next

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील कोपर्डी येथील पीडित कुटुंबाच्या भेटीसाठी मुंबईतून निघालेल्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवलेंना त्यांचा नियोजित दौरा अचानक रद्द करावा लागला तर पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनाही पोलिसांनी कोपर्डीत जाण्यास मज्जाव केला़ दोन दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर यांनाही कायदा आणि सुव्यवस्थेचे कारण पुढे करत पोलिसांनी अडविले होते़
गुरुवारी आंबेडकर यांनी तर शनिवारी कवाडे यांनी नगरमध्येच माध्यमांशी संवाद साधत हत्याकांडाचा निषेध केला़ रामदास आठवले यांनी कोपर्डी येथे येण्याचे जाहीर केल्यानंतर काही संघटनांनी त्यांच्या दौऱ्याला आक्षेप घेतला होता. शिवप्रहार संघटनेचे संजीव भोर कोपर्डीकडे निघालेले असताना पोलिसांनी त्यांना कर्जतमध्ये अडविले. त्यांनी पोलिसांशी वाद घातला.
कोपर्डी व परिसरातील ग्रामस्थांनी मात्र, अतिशय संयमी भूमिका घेत हे प्रकरण हाताळले़ त्यामुळे घटनेनंतर गावात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही़ काही संघटनांच्या स्टंटबाजीच्या इशाऱ्यामुळे मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांना आंबेडकर व कवाडे यांना कोपर्डीत जाण्यापासून रोखावे लागले़ मुंबई विमानतळावर आलेल्या आठवलेंना मुख्यमंत्र्यांचा फोन आल्याने त्यांनाही आपला दौरा रद्द केल्याचे समजते. कोपर्डीत आपण सोबत जाऊ, असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितल्याचे समजते़ मात्र, पोलीस यंत्रणेकडून गेलेल्या अहवालानंतरच मुख्यमंत्र्यांनी आठवलेंना न जाण्याचा सल्ला दिल्याचे बोलले जाते.
कवाडे यांनी मुंबईत आंदोलन झाल्यानंतर कोपर्डी येथे येऊन पीडित कुटुंबाची भेट घेणार असल्याचे जाहीर केले़ रिपाइंचे राज्य सचिव अशोक गायकवाड यांनी सांगितले, कोपर्डीत आम्ही पीडित कुटुंबाची भेट घेतली, तेव्हा कुणीही अडविले नाही़ त्यामुळे आठवले यांनाही कुणी अडविण्याचा प्रश्न येत नाही. (प्रतिनिधी)

सामाजिक वातावरण दूषित करू नये - कवाडे
अल्पवयीन मुलीबाबत घडलेल्या अमानुष घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्राला दु:ख झाले आहे़ सर्वांनी एकत्र येऊन पीडित कुटुंबाच्या मागे उभे राहण्याची गरज असून, या घटनेवरून कुणीही सामाजिक वातावरण दूषित करू नये, असे आवाहन कवाडे यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना केले़

काँग्रेसचा रास्तारोको : कोपर्डी बलात्कार प्रकरण, वाढती महागाई, वीज दरवाढीविरोधात नाशिक शहर कॉँग्रेस व अल्पसंख्याक सेलतर्फे मुंबई-आग्रा महामार्गावर द्वारका चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन करण्यात आला. त्यामुळे काही वेळ द्वारका परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती. शहराध्यक्ष शरद अहेर तसेच युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष नगरसेवक राहुल दिवे आदी आंदोलनात सहभागी झाले होते

Web Title: Quadrena stops; I stopped!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.