अधिकारांसाठी भांडणारी पत्नी क्रूर नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2017 08:58 PM2017-02-17T20:58:25+5:302017-02-17T20:58:25+5:30

स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी पतीविरुद्ध न्यायालयात भांडणाऱ्या पत्नीला क्रूर म्हटले जाऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

The quarreling wife is not cruel, the High Court is restless | अधिकारांसाठी भांडणारी पत्नी क्रूर नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

अधिकारांसाठी भांडणारी पत्नी क्रूर नाही, हायकोर्टाचा निर्वाळा

Next

ऑनलाइन लोकमत/राकेश घानोडे

नागपूर, दि. 17 -  स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी पतीविरुद्ध न्यायालयात भांडणाऱ्या पत्नीला क्रूर म्हटले जाऊ शकत नाही असा महत्वपूर्ण निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.
प्रकरणातील पतीचे विवाहबाह्य संबंध असून तो पत्नीचा हुंड्यासाठी छळ करीत होता. त्यामुळे पत्नी पतीपासून वेगळी रहायला लागली. दरम्यान, पत्नीने सासरच्या घरात राहण्याचा अधिकार व पोटगी मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात दाखल केलेली याचिका मंजूर झाली. त्यानंतर या वादाबाबत वर्तमानपत्रांत बातम्या प्रकाशित झाल्या. या बातम्या पत्नीनेच प्रकाशित करून घेतल्या असे पतीचे म्हणणे होते. त्याने पत्नीची ही कृती क्रूरतेत मोडणारी असल्याचा दावा करून या आधारावर घटस्फोट मिळण्यासाठी कुटुंब न्यायालयात याचिका दाखल केली होती. २२ जुलै २०१३ रोजी कुटुंब न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली. या निर्णयाविरुद्ध पतीने उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय वासंती नाईक व विनय देशपांडे यांनी हे अपील खारीज करून पत्नीने स्वत:चे अधिकार मिळविण्यासाठी न्यायालयात दाद मागणे म्हणजे क्रूरता नव्हे असे स्पष्ट केले. तसेच, पत्नीने पतीसोबतच्या वादाच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रकाशित केल्याचा आरोप पुरावे नसल्याचे सिद्ध झाला नाही.

दुस-या महिलेपासून मुलगी...
प्रकरणातील पतीला दुसऱ्या महिलेपासून ११ वर्षांची मुलगी आहे. पत्नीला घर सोडण्यास भाग पाडल्यानंतर तो दुसऱ्या महिलेसोबत रहायला लागला होता. त्याने सुरुवातीला पत्नीच्या विभक्ततेच्या आधारावर घटस्फोट मागितला होता. कुटुंब न्यायालयाने ही याचिका फेटाळली होती. त्यानंतर त्याने क्रूरतेच्या आधारावर घटस्फोट मागितला. या दाम्पत्याचे ८ मे १९९० रोजी लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे.

 

 

Web Title: The quarreling wife is not cruel, the High Court is restless

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.