शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही; तर खासदारकी काय चाटायची काय? - राजू शेट्टी

By admin | Published: May 19, 2016 07:07 PM2016-05-19T19:07:37+5:302016-05-19T19:19:28+5:30

कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन मग काय रामराज्य करायचं ते करा, असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून शेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले; तर खासदारकी काय चाटायची काय

The question of farmers did not disappear; What about the MP? - Raju Shetty | शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही; तर खासदारकी काय चाटायची काय? - राजू शेट्टी

शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही; तर खासदारकी काय चाटायची काय? - राजू शेट्टी

Next

चाकण येथे रास्ता रोको : शेतकऱ्यांनी महामार्गावर ओतला कांदा; ५ किलोमीटरवर वाहनांच्या रांगा
चाकण : कांद्याला किमान १५ रुपये किलो हमीभाव द्या, अन् मग काय रामराज्य करायचं ते करा, असा राज्य व केंद्र सरकारला टोला मारून ह्यशेतकऱ्यांचे प्रश्न भिजत राहिले; तर खासदारकी काय चाटायची काय? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी चाकण येथे केला.
कांद्याला हमीभाव मिळण्यासाठी चाकण येथे गुरुवार (दि. १९) सकाळी साडेअकराच्या सुमारास शेतकऱ्यांनी पुणे-नाशिक महामार्गावर आंबेठाण चौकात रास्ता रोको आंदोलन केले. या वेळी खासदार राजू शेट्टी बोलत होते. शेतकऱ्यांनी संतप्त होऊन कांदा महामार्गावर ओतून दिला. या आंदोलनामुळे अर्धा तास महामार्गावर दोन्ही बाजूला ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.


राजू शेट्टी म्हणाले, की १९८० च्या दशकात शरद जोशी यांनी शेतकरी संघटनेची स्थापना केली व शेतकऱ्यांचे संघटन करून कांद्यासाठी आंदोलन केले. ३५ वर्षांनंतरही शेतमालाच्या भावासाठी शेतकऱ्यांना वारंवार रस्त्यावर उतरावे लागत आहे. शेतमालाचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश केल्याने जीवनावश्यक वस्तू १९५५ च्या कायद्यानुसार शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार सरकारला प्राप्त झाला. त्यामुळे कांद्याचे भाव वाढले की सरकार हस्तक्षेप करते. पाकिस्तानहून ४० रुपये किलोने कांदा आयात करून शासन येथील शेतकऱ्यांना मातीत घालते, म्हणजे शेतकरी हा पाकिस्तानपेक्षा मोठा शत्रू आहे काय? असा सवाल त्यांनी केला.


या वेळी पोलीस उपविभागीय अधिकारी मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शेतकऱ्यांनी कांद्याला हमीभाव मिळण्याबाबतचे निवेदन मंडलाधिकारी राजाराम मोराळे यांच्याकडे दिले. या आंदोलनात प्रामुख्याने जयप्रकाश परदेशी, दिनेश मोहिते, अनिल देशमुख, गुलाब गोरे, राम गोरे, बाबासाहेब पवार, काळूराम कड, धीरज परदेशी, चंद्रकांत गोरे, बाजीराव जाधव, दशरथ काचोळे, किसन गोरे आदी शेतकरी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता.
चौकट
घामाच्या थेंबा थेंबाचा हिशेब द्या
राज्यकर्ते धोरण बनवतात, शेतमाल स्वस्तात देऊन सर्वसामन्यांचा बळी देतात. भीक नको, पण आमच्या घामाच्या थेंबा थेंबाचा हिशेब द्या. कांदा उत्पादनाचा खर्च किलोस १३ रुपये येत असून, सरकार कांद्याला ३ रुपये ते ६ रुपये भाव देत असेल, तर शेतकऱ्याने कर्ज कसे फेडायचे? उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याची ग्वाही सरकारने दिली होती, म्हणून कांद्याला किमान १५ रुपये हमीभाव मिळाला पाहिजे व प्रत्येक बाजार समितीमध्ये कांदा खरेदी केंद्र सुरू करावे, असे राजू शेट्टी या वेळी म्हणाले.

शेतकरी गळफास घेतात; सरकारला लाज वाटली पाहिजे
देशात गरजेपेक्षा कांद्याचे उत्पादन जास्त झाले असून, जगभर व देशात मंदीची लाट आहे. उद्योजकांनी १ लाख २५ हजार कोटी कर्ज थकविले म्हणून बँकिंग व्यवसाय अडचणीत आला आहे. उद्योजकांना वसुलीचा तगादा लावू नये, म्हणून बँकांना २५ हजार कोटी दिले जातात आणि लाख मोलाचा ७/१२ गहाण ठेवून १० हजार कर्ज देताना लाज वाटली पाहिजे. शेतकऱ्याने कर्ज थकविले, तर नोटीस फलकावर नाव लावता, त्यांच्या जमिनी लिलाव करून विकता, याचा निषेध केला पाहिजे. कांदा खाल्ला नाही म्हणून कुणी तडफडून मेला नाही, पण कांद्याला २/४ रुपये भाव मिळाला म्हणून कर्ज फेडता आले नाही, म्हणून शेतकरी गळफास घेतात, याची सरकारला लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका राजू शेट्टी यांनी केली.

Web Title: The question of farmers did not disappear; What about the MP? - Raju Shetty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.