म्हाडाच्या वेंग्युर्ल्यातील घरांचा प्रश्न मार्गी
By admin | Published: November 20, 2014 02:25 AM2014-11-20T02:25:52+5:302014-11-20T02:25:52+5:30
इम्हाडाच्या कोकण मंडळांच्यावतीने वेग्युर्ल्यात बांधण्यात येणाऱ्या घरांतील अडकाठी येत्या पंधरवड्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे.
मुंबई : इम्हाडाच्या कोकण मंडळांच्यावतीने वेग्युर्ल्यात बांधण्यात येणाऱ्या घरांतील अडकाठी येत्या पंधरवड्यात मार्गी लागण्याची शक्यता आहे. चार मजली (जी+४) इमारतीच्या बांधकामाला स्थानिक मंडळाकडे मंजुरीसाठी मांडण्यात आला आहे.त्यामुळे पुढच्यावर्षी होणाऱ्या घराच्या सोडतीमध्ये त्यांचा समावेश होण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून वर्तविण्यात आली.
म्हाडाच्या वेग्युर्ल्यातील मालकीच्या भुखंडावर गेल्या दोन वर्षापासून घरांचे बांधकाम करण्यात येत आहे. त्यापैकी सध्या मंजुरी मिळालेल्या २५ जूनला १११घराची लॉटरी काढण्यात आली आहे. मात्र ४ मजली इमारतीच्या कामाला मंजुरी न मिळाल्याने उर्वरित प्रकल्पाचे काम रखडले होते. त्याबाबतचे आवश्यक प्रस्तावाची मंजुरी मिळवून स्थानिक नगरपालिकेकडे पाठविण्यात आला आहे. येत्या पंधरवड्यात त्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे याठिकाणी अल्प, मध्यम उत्पन्न गटामध्ये मोठ्या प्रमाणात घरांची उपलब्धता होणार असल्याचे असल्याचे कोकण मंडळातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले (प्रतिनिधी)